पोलिसांमुळे तरुणाने सोडला इच्छामरणाचा विचार 

31dead_body_5B1_5D.jpg
31dead_body_5B1_5D.jpg

पुणे : आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने आई-वडिलांचे आजारपण दूर करू शकत नसल्यामुळे खचलेल्या तरुणाने इच्छामरणाबाबतचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविले. मुख्यमंत्री कार्यालयाकडून हे पत्र दत्तवाडी पोलिसांना आले. पोलिसांनी तरुणाची भेट घेऊन त्याच्याशी काही दिवस संपर्क ठेवून त्याचे मनपरिवर्तन केले.

 दत्तवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये संबंधित तरुण आपल्या आई-वडिलांसमवेत राहतो. मात्र, काही दिवसांपासून तरुणाचे आई-वडील आजारी आहेत. त्यातच आर्थिक परिस्थिती खराब असल्याने त्यांच्या उपचाराचा खर्च भागविता येत नसल्याने तरुण मानसिकदृष्ट्या खचला होता. त्यातूनच त्याने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. याबाबत दत्तवाडी पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक देविदास घेवारे यांनी तरुणाची भेट घेऊन विविध प्रकारची उदाहरणे देऊन त्यास वास्तवाची जाणीव करून दिली. त्यातून त्याच्या मनातील नकारात्मक विचार दूर होण्यास मदत झाली. 

दरम्यान, "कम्युनिटी पोलिसिंग'चे पोलीस हवालदार श्रीकांत शिरोळे यांना तरुणाकडे लक्ष देण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनीही त्याच्याशी सतत संपर्कात राहून मनातील नकारात्मक विचार काढून टाकले. पोलिसांच्या या मदतीमुळे तरुणासह त्याच्या कुटुंबीयांनीही पोलिसांचे आभार मानले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com