थोर पुरुषांची चरित्रे तरुणांनी वाचावीत - पुरंदरे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जानेवारी 2017

पुणे - ""छत्रपती शिवाजी महाराज आणि पहिले बाजीराव पेशवे यांची उदात्तता, त्यागवृत्ती, मुत्सद्देगिरी आणि रणनीतीचा अभ्यास करायला पाहिजे. दोघाही कर्तृत्ववान व्यक्तींची ऐतिहासिक पार्श्‍वभूमी जाणून घेण्याकरिता विशेषतः तरुणांनी त्यांच्या चरित्रांचे वाचन करावे,'' असा सल्ला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी दिला. 

मुळा-मुठा प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात उदय कुलकर्णी लिखित, "दी एरा ऑफ बाजीराव ः ऍन अकाउंट ऑफ दी एम्पायर ऑफ दी डीकेड' या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन पुरंदरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, प्रा. डॉ. राजा दीक्षित उपस्थित होते. 

पुरंदरे म्हणाले,""शिवाजी महाराज आणि बाजीराव पेशवे ही अलौकिक व्यक्तिमत्त्वे होती. शिवाजी महाराज राष्ट्रनिर्माता होते. तसेच बाजीराव पेशवे देखील एकही लढाई न हरलेला लढवय्या योद्धा होते. दोघांचीही रणनीती, इतिहासातील घटना घडामोडी अभ्यासून तरुणांनी त्यापासून अर्थबोध घ्यायला पाहिजे. कर्तृत्ववान व्यक्तींची शाळा निर्माण करणारी ही व्यक्तिमत्त्वे होती.'' 

गोखले म्हणाले,""छत्रपतींनी स्वराज्य उभे केले, तर त्यांच्या पेशव्यांनी सुराज्याचे साम्राज्य उभे करण्यात बाजी मारली. सह्याद्रीच्या कडेकपारीतला गनिमीकावा पठारावर आणून शत्रूला कोंडीत पकडण्याचे कौशल्य श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी साधले.'' 

दीक्षित म्हणाले,""समाजात इतिहासविषयक साक्षरतेचे प्रमाण कमी आहे. ती साक्षरता आणण्याकरिता इतिहासाचे संशोधन व अभ्यास व्हावयास हवा, तरच समाजात निकोप वातावरण निर्माण होईल. भारतातील इतिहास लेखन बहुतांशी "उत्तर भारतीयां'वर केंद्रित आहे. ही स्थिती बदलण्यासाठी अभ्यासपूर्ण रीतीने कार्य करण्याची गरज आहे.'' 

मंजिरी धामणकर यांनी सूत्रसंचालन केले. आभार उपेंद्र दीक्षित यांनी मानले. 

Web Title: youths read the biographies of great men