पुण्यात तरुणाईचे कच-याच्या सेलिब्रेशनवर पथनाट्यातून भाष्य

38983633_891014917771523_18.jpg
38983633_891014917771523_18.jpg

पुणे : ''आधीच स्वच्छ असलेल्या रस्त्यावर पांढ-या स्वच्छ कपड्यातले नेते येतात. सफाई कर्मचा-याच्या हातातील झाडू घेऊन दोन पावले झाडल्या सारखे करतात. कार्यकर्ते प्रेस साठी फोटो सेशन करतात. सेल्फी घेतला जातो. श्रम परिहार म्हणून स्नॅक्स, पेय घेतले जाते. तो कचरा तेथेच टाकला जातो.'' सफाई कर्मचारी म्हणतात, आता हा कचरा पण आम्हीच उचलायचा का? एखाद्या स्वच्छता मोहिमेत दिसणारे हे चित्र पथनाट्यात जशेच्या तशे दाखवून कच-याचे सेलिब्रेशन करण्याच्या प्रवृत्तीवर प्रकाश टाकण्याचे काम शालेय विद्यार्थ्यांनी केले.

महात्मा गांधी जयंती निमित्त माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ संचलित महेश विद्यालय सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पथनाट्याचे आयोजन केले होते. या नाट्याने बेगडी समाजसेवा करण्यापेक्षा मनापासून कृती करण्याचा संदेश दिला.
भजन, सत्य, अहिंसा व स्वच्छता संदेश देत विद्यार्थ्यांची प्रभात फेरी आशिष गार्डन चौकातून गणंजय सोसायटी, शास्रीनगर, आझादवाडी भागातून काढण्यात आली. विद्यार्थ्यांची सहल आगाखान पॅलेसमध्ये नेण्यात आली. तेथे विद्यार्थ्यांनी गांधी विचार समजून घेतले.
या कार्यक्रमासाठी शाळा समितीचे अध्यक्ष बालाप्रसाद बजाज, तनुजा लढ्डा, स्नेहलता धुत उपस्थित होते. संयोजन मुख्याध्यापिका जान्हवी अजोतीकर यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com