हरियाणाच्या युधिष्ठीरने पटकावली चांदीची गदा

yudhishthir
yudhishthir

वालचंदनगर (पुणे) : रणगाव (ता.इंदापूर) येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या लाल मातीमधील कुस्ती स्पर्धेमध्ये  हरियाणाच्या युधिष्ठीर ने पुण्याच्या विलास डोईफोडे याला चितपट करुन  चांदीची गदा पटकावली आहे.

येथे मंगळवार (ता. २८) रोजी लाल मातीतील कुस्त्यांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाची  कुस्ती हरियाणाच्या युधिष्ठीर व पुण्याच्या विलास डोईफोडे यांच्यात झाली. चुरशीच्या लढतीत युधिष्ठीर याने विलास डोईफोडे ला दहा मिनिटांनंतर आस्मान दाखवून चांदीची गदा पटकावली. द्वितीय क्रमांकाची कुस्तीमध्ये सोलापूरच्या योगेश पवार याने कोल्हापूरच्या योगेश डोंबाळे याला पराभूत केले.

तृतीय क्रमांकाच्या कुस्तीमध्ये पुण्याच्या अनिल जाधव याने  कुर्डूवाडीच्या सुनील शेवतकर याला पराभूत केले विजय मिळवला. कोल्हापूरच्या सिकंदर शेख याने  कुर्डूवाडीच्या महारुद्र काळेल याला आस्मान दाखवले.

आखाड्यामध्ये १६० कुस्त्या पार पडल्या.  कुस्तीस्पर्धेचे आयोजन राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष रणजीत पवार यांनी केले होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, जिल्हा परिषद सदस्या वैशाली पाटील, माजी सभापती  पहिलवान मंगलदास बांदल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे,उपसभापती यशवंत माने, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, छत्रपतीचे संचालक अनिल बागल ,तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील,अनिल राजीवडे,अभयराज शिरोळे,सरपंच अशोक राजीवडे , अशोक घोलप, अंकुश रणमोडे  उपस्थित होते. सुत्रसंचालन शंकर पुजारी,प्रशांत भागवत यांनी केले.

इंदापूरकरांची आभारी आहे : सुप्रिया सुळे...
कुस्तीच्या मैदानाला खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली.यावेळी सुळे यांनी सांगितले की,लोकसभेच्या निवडणूकीमध्ये इंदापूर तालुक्याने विक्रमी मताधिक्य दिले आहे.याबद्दल मी इंदापूरची आभारी आहे.निवडणूकीमध्ये हार-जित होत असल्याने सांगून खासदारकीची कुस्ती जिंकली असल्याचे सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com