जागावाटपावरून ठरविणार युती

ज्ञानेश्‍वर बिजले - @dbijale_sakal
मंगळवार, 17 जानेवारी 2017

भाजप, शिवसेना अधिक जागांसाठी आग्रही; कोथरूड परिसरातील चित्र

कोथरूड - भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यातील युती ही मुख्यत्वे कोथरूड विधानसभा मतदारसंघातील जागावाटपावरूनच ठरणार आहे. दोन्ही पक्ष जास्त जागा मिळविण्यासाठी आग्रही राहणार आहेत.

मतदारसंघातील निम्म्यापेक्षा जास्त जागांसाठी शिवसेना आग्रही राहणार असून, भाजपचे कार्यकर्ते मात्र युती नकोच या भूमिकेवर ठाम आहेत.

भाजप, शिवसेना अधिक जागांसाठी आग्रही; कोथरूड परिसरातील चित्र

कोथरूड - भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यातील युती ही मुख्यत्वे कोथरूड विधानसभा मतदारसंघातील जागावाटपावरूनच ठरणार आहे. दोन्ही पक्ष जास्त जागा मिळविण्यासाठी आग्रही राहणार आहेत.

मतदारसंघातील निम्म्यापेक्षा जास्त जागांसाठी शिवसेना आग्रही राहणार असून, भाजपचे कार्यकर्ते मात्र युती नकोच या भूमिकेवर ठाम आहेत.

युती होणार नाही, असे गृहीत धरून दोन्ही पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली; मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर युतीबाबतची चर्चा मुंबईत सुरू झाली. त्याच पद्धतीने पुण्यातही चर्चा सुरू होणार आहे. त्याबाबत कोथरूडमधील दोन्ही पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधला असता, त्यांच्या बोलण्यात युतीबाबत फारशा अनुकूल प्रतिक्रिया व्यक्त झाल्या नाहीत. 

कोथरूड मतदारसंघात महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे चार, तर भाजपचे तीन नगरसेवक विजयी झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सात जागा जिंकत युतीच्या बालेकिल्ल्यात मुसंडी मारली होती. युतीची मते मनसेकडे वळल्याची त्या वेळी चर्चा झाली होती. 

दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढण्याची तयारी करताना भाजपने मनसे व अन्य पक्षांतील प्रमुख कार्यकर्त्यांना त्यांच्या पक्षात घेतले आणि प्रभाग अनुकूल करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. 

या वेळी भाजपच्या जागा वाढतील, अशी स्थिती निर्माण झाली असताना पुन्हा युती करण्याबाबत चर्चा सुरू झाल्याने भाजपमधील इच्छुक उमेदवार चिंताग्रस्त झाले आहेत. त्यांनी स्वतंत्र लढण्याचा आग्रह त्यांच्या स्थानिक नेत्यांकडे धरला आहे. जागा जास्त जिंकण्याची संधी असताना व पक्षासाठी अनुकूल वातावरण असताना ही संधी का गमवायची, असा प्रतिप्रश्‍न या भागातील भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने ‘सकाळ’शी बोलताना उपस्थित केला.
 

तिरंगी लढतीचा मनसेना फायदा?
भाजप-शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी झाल्यास पंचरंगी लढत तिरंगी होईल. त्यामुळे मनसेला फायदा होईल, असे मनसेच्या कार्यकर्त्यांना वाटते. गेल्या वेळी अशाच लढतीचा फायदा त्यांना झाला होता. महापालिका निवडणुकीत मतदार पक्षाबरोबरच संबंधित उमेदवाराची प्रतिमा, त्याचे कार्य विचारात घेत असल्यामुळे केवळ पक्षावर मतदान होणार नाही, असे मत या भागातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
 

सेनेला निम्म्यापेक्षा अधिक जागा हव्या
शिवसेनेच्या बाजूने सर्व प्रभागांत चांगली लढत देण्याची तयारी सुरू झाली आहे. 

या भागात शिवसेनेचे कार्य गेली तीस-चाळीस वर्षे असल्याने त्यांनी या परिसरातून जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्षबांधणी सुरू केली आहे. 

युती झाल्यास कोथरूड मतदारसंघात निम्म्यापेक्षा जास्त जागा शिवसेनेला मिळाल्या पाहिजेत. 

प्रभाग क्रमांक नऊ, दहा आणि बारामध्ये प्रत्येकी तीन जागा, प्रभाग ११ व १३ मध्ये प्रत्येकी दोन जागा, तर प्रभाग ३१ मध्ये एक जागा अशा २४ पैकी १४ जागा शिवसेनेला मिळाव्यात, अशी अपेक्षा शिवसेनेच्या या भागातील ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केली.

Web Title: yuti on seat distribution