पुणे विद्यापीठातर्फे ‘युवा गौरव’

Pune-University
Pune-University

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे या वर्षापासून ‘युवा गौरव’ पुरस्कार देण्यात येणार आहेत. राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ४० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वय असलेल्या युवक-युवतींसाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे. त्यासाठी ३ जानेवारीपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कला (ललित कला, प्रयोगजीवी कला, इत्यादी. सर्व प्रकारच्या कला), क्रीडा, साहित्य, संशोधन, सामाजिक कार्य हे पुरस्कार पुढील क्षेत्रातील कामगिरीसाठी दिले जाणार आहेत. या पुरस्कारासाठी इच्छुक उमेदवार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा किमान पदवीधारक असावा. उमेदवाराने प्रत्यक्ष विद्यापीठातील विभागातून किंवा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पुणे, नगर व नाशिक जिल्ह्यांमधील महाविद्यालयातून/मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी किंवा पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे, अशी माहिती विद्यापीठाच्या नियोजन व विकास विभागाचे उपकुलसचिव मुंजाजी रासवे यांनी दिली.

पुरस्काराचे स्वरूप मानपत्र आणि रु. २५ हजार असे असणार आहे. ते विद्यापीठाच्या स्थापनादिनी दिले जातील. एका वर्षी जास्तीत जास्त ४ जणांना पुरस्कार दिले जातील. या पुरस्कारांसाठी येणाऱ्या प्रस्तावांमधून पात्र व योग्य व्यक्तींची निवड करण्यासाठी विद्यापीठाने शोध समिती नियुक्त केली आहे. या पुरस्कारासाठी योग्य व पात्र व्यक्तींच्या नावांची शिफारस करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने विद्यापीठ कार्यक्षेत्रातील शिक्षण संस्था आणि कला, क्रीडा, साहित्य, संशोधन, सामाजिक कार्य क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी नामनिर्देशने पाठवावीत, असे आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com