विद्यापीठात आजपासून ‘युवा स्पंदन’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

पुणे - विद्यार्थ्यांची सांस्कृतिक अभिरुची अधिकाधिक समृद्ध करणारा ‘युवा स्पंदन’ हा आंतरविद्यापीठीय पश्‍चिम विभाग युवक महोत्सव यंदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होत आहे. हा महोत्सव बुधवार (ता. १९) ते रविवार (ता. २३) दरम्यान होत असून, त्याचे उद्‌घाटन ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते दुपारी चार वाजता महोत्सवाच्या मुख्य मंडपात होणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि नवी दिल्ली येथील असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव होत आहे. पहिल्यांदाच विद्यापीठाला या महोत्सवाचा मान मिळाला आहे. महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि राजस्थान या चार राज्यांतील जवळपास एक हजार ५७७ विद्यार्थ्यांनी महोत्सवासाठी नोंदणी केली आहे. जवळपास एक हजार २९७ विद्यार्थी कलाकार महोत्सवात सहभागी होणार आहेत. संगीत, नृत्य, नाट्य, ललित कला आणि साहित्य अशा कला सादर होणार आहेत, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी पत्रकार परिषदेत दिली. उद्‌घाटनप्रसंगी अभिनेते गिरीश कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. महोत्सवात विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शनही असणार आहे.

महोत्सवातील वैशिष्ट्ये 
 चार राज्यांतील ३२ विद्यापीठांतील विद्यार्थ्यांचा सहभाग
 ‘कलावंत कट्टा’त छायाचित्रकार सतीश पाकणीकर, अभिनेत्री मुक्ता बर्वे, नृत्यांगना सुचेता चाफेकर, 
गायक श्रीनिवास जोशी यांच्याशी संवाद
 पु. ल. देशपांडे, लालन सारंग, बी. आर. खेडेकर, 
पं. भीमसेन जोशी, प्र. के. अत्रे, आर. डी. बर्मन यांच्या नावाने मंच. 
 संगीत, साहित्य, ललित कला, नाट्य, नृत्य कलांचे सादरीकरण

Web Title: Yuva Spandan in University