युवासेनेचा ग्रामीण व शहरी भागात विस्तार करणार

राजेंद्रकृष्ण कापसे
गुरुवार, 29 मार्च 2018

युवासेनेमार्फत शिक्षण, आरोग्य व रोजगार या विभागात भरीव काम करण्यात येणार आहे. त्यातून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना अभिप्रेत असणारी संघटनात्मक बांधणी करण्याचा निर्धार बांगर यांनी व्यक्त केला.

वारजे माळवाडी : बारामती लोकसभा मतदार संघातील शिवसेना, युवासेना पदाधिकारी व शिवसैनिकांचा उत्साह पाहता या मतदार संघात युवासेनेची चांगली बांधणी करून युवासेनेचा ग्रामीण व शहरी भागात विस्तार करणार असे युवासेनेचे राज्याचे विस्तारक सचिन बांगर यांनी सांगितले.

बारामती लोकसभा मतदार संघातील सर्व युवासेना पदाधिकारी व युवासैनिक यांची बैठक नुकतीच शिवसेनेच्या डेक्कन येथील कार्यालयात झाली. बारामती लोकसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख सत्यवान उभे साहेब, युवासेना विस्तारक सचिन बांगर, शिवसेना सहसंपर्कप्रमुख विलास वाव्हळ, बाळासाहेब चांदेरे, शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, शिवसेना तालुका संपर्कप्रमुख प्रितम उपलप, राम कदम, संतोष घोसाळकर, युवासेना जिल्हा युवा अधिकारी सचिन पासलकर, अविनाश बलकवडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पासलकर, रमेश जाधव, जिल्हा परिषद सदस्या स्वाती टकले, शिवसेना महिला आघाडी उपजिल्हासंघटक दिपाली बरीदे, भारतीय विद्यार्थी सेनेचे रामभाऊ गायकवाड, बारामती लोकसभा मतदार संघातील सर्व शिवसेना तालुकाप्रमुख तसेच युवासेना पदाधिकारी व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवासेनेमार्फत शिक्षण, आरोग्य व रोजगार या विभागात भरीव काम करण्यात येणार आहे. त्यातून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना अभिप्रेत असणारी संघटनात्मक बांधणी करण्याचा निर्धार बांगर यांनी व्यक्त केला.

बैठकीत काय झाले 
१) बारामती लोकसभा मतदार संघाच्या युवासेनेच्या कामकाजाबाबत विधानसभा निहाय आढावा.
२) युवासेना रिक्त पदावर नेमणुकीसाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलाखती नियोजन करणे.
३) विधानसभा निहाय दौऱ्यांचे नियोजन करून युवासेनेचा ग्रामीण व शहरी भागात विस्तार करणे.
४) युवासेनेमार्फत घेण्यात येणाऱ्या सीईटीच्या सराव परीक्षाचे नियोजन करणे
५) युवासेनेमार्फत शिक्षण, आरोग्य व रोजगार ह्या विभागा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांवर चर्चा करणे.

Web Title: YuvaSena in Pune