आरोग्य सभापतीची गाडी झाली रुग्णवाहिका

राजकुमार थोरात
गुरुवार, 10 मे 2018

आज गुरुवार (ता.१०) रोजी अडीच वाजण्याच्या सुमारास इंदापूरमधील गणेश राजाराम पवार (वय ३५) या युवकाचा भादलवाडी जवळील बिल्ट ग्राफीक्स कंपनीजवळ अपघात झाला होता. अपघातामध्ये पवार यांची तीन चाकी गाडी रस्त्यालगत पडली होती. पवार हे रस्त्याच्या बाजुला बेशुद्ध पडले होते. रक्तस्त्राव सुरु असल्याने पवार हे रक्ताने माखलेले होते.

वालचंदनगर - पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी अपघातामध्ये रक्ताने माखलेल्या व बेशुद्ध पडलेल्या युवकाला स्वत:च्या गाडीमधून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.

आज गुरुवार (ता.१०) रोजी अडीच वाजण्याच्या सुमारास इंदापूरमधील गणेश राजाराम पवार (वय ३५) या युवकाचा भादलवाडी जवळील बिल्ट ग्राफीक्स कंपनीजवळ अपघात झाला होता. अपघातामध्ये पवार यांची तीन चाकी गाडी रस्त्यालगत पडली होती. पवार हे रस्त्याच्या बाजुला बेशुद्ध पडले होते. रक्तस्त्राव सुरु असल्याने पवार हे रक्ताने माखलेले होते.

पवार यांच्या चेहऱ्यावरती रुमाल झाकून रुग्णवाहिकेची वाट पाहत थांबले होते. याच दरम्यान जिल्हापरिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने भिगवणवरुन इंदापूरकडे जात असताना त्यांना कंपनीजवळ गर्दी दिसल्याने त्यांनी गाडी थांबवली. पवार यावेळी बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेले दिसले. त्यांच्याजवळ गेल्यानंतर श्‍वास सुरु असल्याचे लक्षात येताच तातडीने रुग्णवाहिकेची वाट न पाहता स्वत:च्या गाडीतुन इंदापूरमध्ये आणून खासगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल केले. 

माने हे स्वत: ऑपरेशन थिअटरच्या बाहेर अर्धा तास उभा  होते. प्राथमिक  उपचारानंतर माने यांनी डॉक्टरांशी चर्चा करुन आवश्‍यकता असल्यास उपचारासाठी अकलुज मधील दवाखान्यामध्ये नेण्याची सुचना केली.

Web Title: z p chairmans car has been ambulance