दोन पिढ्यांतील जुगलबंदीने रसिक तृप्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

पुणे - संगीताच्या क्षेत्रातील दुसऱ्या पिढीचे शिलेदार संतूरवादक राहुल शर्मा, बासरीवादक राकेश चौरसिया आणि जुन्या - नव्या पिढीला आपल्या जादुई तबलावादनाने साथसंगत करणारे उस्ताद झाकीर हुसेन यांच्या अनोख्या जुगलबंदीने रविवारी पुणेकर रसिकांना मंत्रमुग्ध केले. 

निमित्त होते ‘सा’ व ‘नी’तर्फे आयोजित केलेल्या धरोहर या कार्यक्रमाचे. राहुल शर्मा यांनी राग श्री सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यांच्या संतूरवादनाने रसिकांचे कान तृप्त झाले. त्यानंतर झपताल व तीन तालात झाकीर हुसेन यांच्यासह त्यांची जुगलबंदी रंगली. पूर्वार्धाच्या शेवटी त्यांनी जाझची अनुभूती देणारी फ्यूजन रचना सादर केली. भारतीय संगीत व पाश्‍चात्य संगीताचा अनोखा मिलाफ घडवत त्यांनी रसिकांना वेगळ्याच दुनियेत नेले.

उत्तरार्धात बासरीवादक राकेश चौरसिया यांनी राग जोग सादर केला. त्यानंतर झाकीर हुसेन यांच्या साथीत रुपक तालातील रचना व राग हंसध्वनी सादर केला. रसिकांच्या आग्रहास्तव त्यांनी ‘बाजे मुरलिया बाजे’सह पहाडी धून सादर केली. कार्यक्रमात राज्य शासनाचा अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार मिळाल्याबद्दल पं. विनायकराव थोरात यांचा झाकीर हुसेन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title: Zakir Hussain and Rahul Sharma Music