माळरानावर बहरला झेंडू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

टाकवे बुद्रुक - शेतात काय पिकते यापेक्षा बाजारात काय विकते, याकडे हंगामा नुसार पाहिले तर शेती देखील किफायतशीर होते, याचा विचार करून आंदर मावळातील दवणेवाडीच्या शेतकऱ्यांनी यंदा उघड्या माळरानावर झेंडूचा मळा फुलवला आहे. घटस्थापना, त्यापाठोपाठ दसरा आणि पुढे येणारी दिवाळी हा हंगाम लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी केलेली फुलाची शेती त्यांना फायदेशीर ठरत आहे. नरेश येळवंडे हा ऐन पंचविशीतील तरुण शेतकरी, दरवर्षी हंगामानुसार शेतीत पिके घेतो. या वर्षी भात लावणी झाल्यावर भात खाचराच्या पलीकडील मोकळ्या माळरानावर त्यांनी झेंडूची रोपे लावली. दीड एकरात उभ्या आडव्या सरी पाडून लावलेली रोपे वाढली.

टाकवे बुद्रुक - शेतात काय पिकते यापेक्षा बाजारात काय विकते, याकडे हंगामा नुसार पाहिले तर शेती देखील किफायतशीर होते, याचा विचार करून आंदर मावळातील दवणेवाडीच्या शेतकऱ्यांनी यंदा उघड्या माळरानावर झेंडूचा मळा फुलवला आहे. घटस्थापना, त्यापाठोपाठ दसरा आणि पुढे येणारी दिवाळी हा हंगाम लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी केलेली फुलाची शेती त्यांना फायदेशीर ठरत आहे. नरेश येळवंडे हा ऐन पंचविशीतील तरुण शेतकरी, दरवर्षी हंगामानुसार शेतीत पिके घेतो. या वर्षी भात लावणी झाल्यावर भात खाचराच्या पलीकडील मोकळ्या माळरानावर त्यांनी झेंडूची रोपे लावली. दीड एकरात उभ्या आडव्या सरी पाडून लावलेली रोपे वाढली. खताची योग्य मात्रा, पावसाचे पाणी यात रोपे दरदरून वाढली. पिवळ्या आणि केशरी रंगाच्या फुलांनी मळा भरला. 

घटस्थापना अवघ्या दोन दिवसांवर आल्याने त्यांनी आता फुलांची खुडणी हाती घेतली आहे. दसऱ्यापर्यंत ती सुरू राहील, असे ते म्हणाले. तळेगाव, वडगाव, कामशेतच्या बाजारात प्रतिकिलोला ९० ते १०० रुपये भाव मिळाल्यास सरासरी ७० ते ८० हजार रुपयांचे उत्पन्न मिळेल. खर्च वगळता राहिलेला नफा पुरेशा आहे, असेही येळवंडे म्हणाले. लग्न सोहळ्याच्या हंगामात फरसबी, काकडी, भाजीपाला पिकवण्याचा त्यांचा मानस आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Zendu Agriculture Success