भारताचे वैर केवळ दहशतवादाशी - भूषण गोखले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 फेब्रुवारी 2019

पुणे - ‘भारताकडून दहशतवादी पोसले जात नाहीत. त्यामुळे प्रतिहल्ला होईल ही, भीती बाळगण्याचे कारण नाही. आपले वैर पाकिस्तानातील जनतेशी नसून तिथे पोसल्या जाणाऱ्या दहशतवादाशी आहे. आतातरी पाकिस्तानने दहशतवादाला खतपाणी घालू नये. भारतीय सेना ही संरक्षण सेना नसून सशस्त्र सेना आहे,’’ असे मत एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी व्यक्त केले.

‘सकाळ’ने प्रकाशित केलेल्या आणि निवृत्त नौदल अधिकारी विनायक अभ्यंकर यांनी लिहिलेल्या ‘झेप रणभूमीवर’ या पुस्तकाचे मंगळवारी प्रकाशन झाले. या वेळी डॉ. रामचंद्र देखणे उपस्थित होते. १९४७ नंतर हुतात्मा झालेल्या प्रत्येकाला हवाई दलाच्या हल्ल्यांमुळे आदरांजली मिळाली आहे. पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव प्रचंड आहे. किमान आतातरी त्यांनी दहशतवाद त्यागावा.

आपल्या देशात प्रचंड देशभक्ती आहे. कारगिल युद्धावेळी रस्त्यावरील भिकाऱ्यांनीही काही पैसे गोळा करून जवानांना मदत केली होती, असे सांगताना गोखले देशप्रेमाने भावनिक झाले. भारत-पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धाचे रोमांचकारी अनुभव, पराक्रमांचा इतिहास या पुस्तकात आहे, असे देखणे यांनी सांगितले. विशाखा अभ्यंकर यांनी आभार मानले.

नाव राखले, शान राखली
‘नाव राखले, शान राखली, भारतीयांच्या परंपरेची मान उंचावली’ ही ‘सकाळ’चे वाचक विनायक ताठे यांनी तयार केलेली कविता कार्यक्रमाच्या सुरवातीला सादर करण्यात आली. 

नाव राखले, शान राखली
‘नाव राखले, शान राखली, भारतीयांच्या परंपरेची मान उंचावली’ ही ‘सकाळ’चे वाचक विनायक ताठे यांनी तयार केलेली कविता कार्यक्रमाच्या सुरवातीला सादर करण्यात आली.

Web Title: Zep Ranbhumivar Book Publish Bhushan Gokhale