महापौर, उपमहापौरांच्या प्रभागात शून्य कचरा प्रकल्प 

महापौर, उपमहापौरांच्या प्रभागात शून्य कचरा प्रकल्प 

पुणे : स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत जीआयएस मॅपिंगद्वारे शून्य कचरा प्रकल्प राबविण्यात आला आहे. यामुळे या भागातील कचऱ्याचे उत्तम व्यवस्थापन झाले आहे. याच धर्तीवर पुणे महापालिकेने महापौर आणि उपमहापौर यांच्या प्रभागात शून्य कचरा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर शहराच्या इतर भागात त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
 
औंध व बाणेर भागातील प्रभाग क्रमांक 8 आणि 9 मध्ये स्मार्ट सिटीकडून शून्य कचरा प्रकल्प राबविला जात आहे. यामध्ये प्रभागातील बैठी घरे, मोठ्या सोसायट्या, रुग्णालय, शाळा, हॉटेल, व्यावसायिक इमारती यांचे जीएसआय मॅपिंग करण्यात आले आहे. या मिळकतीमध्ये निर्माण होणाऱ्या दैनंदिन कचऱ्याच्या नोंदी घेतल्या जातात. यात ओला कचरा किती, सुका कचरा कचरा किती, यातील वर्गीकरण केलेल्या कचऱ्याचे प्रमाण किती आहे, सोसायटीकडून कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली जाते? याची माहिती घेतली जाते. त्यानंतर हा कचरा प्रत्येक ठिकाणांवरून गोळा करण्यापासून ते त्यावर प्रक्रिया करे पर्यंतची सर्व माहिती ऑनलाइन भरून ती अद्ययावत केली जाते. या कार्यपद्धतीमुळे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने होत आहे. अशाच प्रकारचे काम पुणे महापालिकेने कचरा व्यवस्थापन करण्याचे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी प्रशासनाला दिले आहेत.
 
घनकचरा विभागाने यासाठी महापौर मुक्ता टिळक यांचा प्रभाग क्रमांक 15 आणि उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा प्रभाग क्रमांक दोन याची निवड केली आहे. या ठिकाणी जीपीएस मॅपिंगचे काम सुरू आहे. त्यानंतर तीन महिन्यात हा शून्य कचरा प्रकल्प पूर्ण केला जाईल. स्वच्छ संस्थेची या भागातील माहिती संकलित केली जात आहे. या दोन प्रभागांसह आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त ही एक प्रभाग दत्तक घेणार आहेत, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्‍वर मोळक यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com