जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा इंदापूर दौरा; तालुक्यातील कोरोनास्थितीचा घेतला आढावा

डॉ. संदेश शहा
Sunday, 13 September 2020

इंदापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रदिप ठेंगल यांच्या मार्फत शहरात सुरू असलेल्या कोरोना सर्वेक्षण सर्व्हेची माहिती घेवून समाधान व्यक्त केले. माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर नगरपरिषद व पंचायत समिती मार्फत सुरू आरोग्य तपासणीची यावेळी त्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.

इंदापूर - जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रदिप ठेंगल यांच्या मार्फत शहरात सुरू असलेल्या कोरोना सर्वेक्षण सर्व्हेची माहिती घेवून समाधान व्यक्त केले. माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर नगरपरिषद व पंचायत समिती मार्फत सुरू आरोग्य तपासणीची यावेळी त्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या कु. अंकिता हर्षवर्धन पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, नगराध्यक्षा सौ. अंकिता मुकुंद शहा, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, नगर परिषद मुख्याधिकारी डॉ. प्रदिप ठेंगल यांच्या समवेत नगरपरिषदेच्या आरोग्य सर्वेक्षणाचा आढावा घेतला. यावेळी अंकिता पाटील यांनी अकील तांबोळी तसेच अमीर इनामदार यांच्या परिवाराची पल्स ऑक्सिमीटर व्दारे तपासणी केली. 

...अखेर व्यापाऱ्यांनीच या ठिकाणी जनता कर्फ्यू स्विकारला

यावेळी डॉ. ठेंगल म्हणाले, पहिल्या टप्प्यात इंदापूर नगरपरिषदेचे आरोग्य कर्मचारी,शिक्षक, आरोग्य सेविका यांनी नागरिकांच्या घरी जावून पल्स ऑक्सीमीटर, थर्मल स्क्रिनिंगच्या सहाय्याने नागरिकांची आरोग्य तपासणी करायलासुरुवात केली आहे. ज्या नागरिकांना कोरोनाची लक्षणे दिसतील, त्यांची इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वसतिगृहात रँपीड अँटीजन चाचणी घेण्यात येणार आहे. इंदापूर तालुक्यात आजअखेर १४५० कोरोना रुग्ण असून शहरात ३३४ रुग्ण कोरोना बाधीत आढळून आले आहेत.

बारामतीतील डॉक्टर म्हणताहेत, ...तर कोविड केअर सेंटर बंद करणार

तालुक्यात कोरोनामुळे ५५, शहरात १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील दोन महिन्यात शहरात जवळपास ५० व्यक्तींचा कोरोनाच्या भीतीने तसेच इतर शारिरीक व्याधीने अचानक मृत्यू झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी माहिती न लपवता लक्षणे आढळताच कोरोना चाचणी केली तरच कोरोनावर मात करणे शक्य होईल.

यावेळी मुकुंद शहा, भरत शहा, धनंजय पाटील, कैलास कदम, शकील सय्यद, पै. पांडुरंग शिंदे, जगदीश मोहिते, रमेश धोत्रे, इम्रान जमादार उपस्थित होते.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Zilla Parishad Chief Executive Officers visit to Indapur