जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण

maval
maval

टाकवे बुद्रुक - करंजगाव ता.मावळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने शतकोत्तर सुवर्णमहोत्सव वर्षात पदार्पण केले आहे. या शाळेची स्थापना १८६८ ला झाली असून, सुमारे दीडशे वर्षेपूर्वीची शाळा जीवन शिक्षण विद्या मंदीर ब्राम्हणवाडी या नावाने प्रचलित होती. स्वातंत्र्यपूर्व काळातील शाळेने गेल्या दहा वर्षात कात टाकली आहे.

लोक सहभागातून शाळेने केलेला कायापालट वाखण्या सारखा आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतलेली सुमारे पंचवीस विद्यार्थी परत माघारी या शाळेत आले. या मागे शाळेने केलेला बद्दल महत्वाचा आहे. सन १८६८च्या सुमारास प्रवेश घेतलेले विद्यार्थ्याची नावे तात्कालीन मोडी लिपीत असल्याने त्यांचे रेकॉर्ड शाळेत नसले तरी १९२२पासून पुढच्या विद्यार्थ्यीची नावे शाळेच्या जनरल रजिस्टरमध्ये नमूद आहे. जीवन शिक्षण विद्या मंदीर शाळाने. जिल्हा परिषदेच्या नावात बद्दल झाला.

तत्पूर्वी सर्वच शाळा गावाच्या मंदीरात, चावडी भरायच्या तशी ही शाळा देखील देखील चावडी, मंदीरांनी पाहिले. कित्येक गुरूजन आले, आणि कित्येक गेले प्रत्येकाने आपआपल्या परीवे ज्ञानदानाचे पवित्र काम अविरतपणे सुरू झाले. शाळेने पारतंत्र्याचा काळ पाहिला, स्वातंत्र्याचा काळ पाहिला. या गावात ऐताहासिक पेशवेकालीन दगडी तलाव, वेगवगळया देवदेवतांची मंदीरे आहे. गावाला ऐताहासिक वारसा लाभला असल्याचे गावकरी नमूद करतात. शाळने अनेक विद्यार्थी घडविले, येत्या दहा वर्षाचा विचार केला तरी ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, जानकीदेवी ग्रामविकास संस्था, लीला पूनावाला फाऊंडेशन, मुस्कान फाऊंडेशन, रोटरी क्लब या सर्वाच्या सहकार्याने शाळेने बाळस धरले आहे.

फाऊंडेशन, रोटरी क्लब या सर्वाच्या सहकार्याने शाळेने बाळस धरले आहे.
साबळेवाडी, मोरमारेवाडी, गाडेवाडी, करंजगाव गावठाण, ब्राम्हणवाडी येथील २१७ विद्यार्थी पहिली ते सातवी पर्यत शिक्षण घेत आहे. मागील चार वर्षापासून शाळेतील पटसंख्येचा आलेख चढता आहे.याची कारणे तशी आहे. गावाला ही आपली शाळा वाटते, अद्यावत सुसज्ज संगणक कक्ष, मुलांमुलींसाठी स्वतंत्र शौचालय, ई लर्निग, प्रत्येक वर्गासाठी शैक्षणिक साहित्याने समृद्ध व बोलक्या वर्ग खोल्या, इयत्ता पहिलीच्या वर्गात रंगीबेरंगी सजावट करून अभ्यास क्रम चित्ररला आहे. क्रिडांगण, क्रिडा साहित्य, कवायत साहित्य, लेझीम साहित्य याची मुबलता असून दररोज विद्यार्थी त्याचा सराव करीत आहे. सांस्कृतिक व क्रिडा स्पर्धेत केंद्र, बीट, तालुका व जिल्हास्तरावर विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे, शिष्यवृत्ती, नवोदय या परिक्षेतही विद्यार्थी पुडे आहेत. परिसर भेट, सहल, वनभोजन या सारखे उपक्रमातून प्रत्यक्ष अनुभव देण्याचा प्रयत्न केला जातो. बॅक व पोस्टाच्या कामकाजाची माहिती दिली जाते,पाढे पाठांतर,इंग्रजी शब्दांचे स्पेलिंग पाठांतर, नाटय स्पर्धा, निंबध, वकृत्तव, रांगोळी, समूह गान, सामान्यज्ञान स्पर्धांचे आयोजन वर्षेभर केले जाते. सायकल बॅक करून साबळेवाडी, मोरमारेवाडीतून पायपीट करीत शाळेत येणा-या विद्यार्थ्यांची पायपीट थांबविण्यात शाळेने पुढाकार घेतला आहे.

मुख्याध्यापिका अरूणा सोणवणे म्हणाल्या, शिक्षक व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हा बद्दल होत आहे. लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांचे वारंवार मार्गदर्शनाने मिळते. शिक्षक शाळेसाठी आधिक वेळ खर्च करतात, याचा अभिमान आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com