
पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी इस्रो आणि अमेरिकेतील नासाला भेट देण्याची संधी मिळणार आहे. जिल्हा परिषदेतील २५ विद्यार्थी नासाला तर ४० विद्यार्थी इस्रोला भेट देणार आहेत. नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना ही संधी मिळत आहे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी विद्यार्थ्यांना नाास आणि इस्रोला भेट देण्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेतलाय.