‘झिपऱ्या’च्या शोला दिग्गजांची उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

पुणे - ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांच्या झिपऱ्या कादंबरीवर आधारीत ‘झिपऱ्या’ या मराठी चित्रपटाच्या ‘स्पेशल शो’ला माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, प्रतिभा पवार, ज्येष्ठ पत्रकार आणि राज्यसभा खासदार कुमार केतकर, ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, सिनेअभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्यासह अनेक दिग्गजांची उपस्थिती होती.  

आशय फिल्म क्‍लब, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग, ग्रंथाली प्रकाशन, एआरडी एंटरटेनमेंट ॲण्ड दिवाज प्रॉडक्‍शन यांच्यातर्फे राष्ट्रीय फिल्म संग्रहालय (एनएफएआय) येथे सोमवारी हा शो पार पडला.

या वेळी कुमार केतकर यांनी विविध विषयांमध्ये संशोधन करणाऱ्या पत्रकार व विद्यार्थ्यांना अरुण साधू मेमोरीअल ट्रस्टमार्फत पाठ्यवृत्ती देण्याची घोषणा केली. याप्रसंगी व्यासपीठावर साधू यांच्या पत्नी अरुणा साधू, शरद पवार, उज्ज्वला बर्वे आणि अश्विनी रणजित दरेकर उपस्थित होते. 
पवार म्हणाले, ‘‘साधू यांचे लिखाण मराठी वाचकांच्या अंतःकरणापर्यंत पोचले. मुंबईचे अस्वस्थ वास्तव, लोकलच्या परिसरातील तरुणांची सुख-दुःखे त्यांनी प्रभावीपणे मांडली.’’

पाठ्यवृत्तीसाठी ट्रस्टला प्रवरा शिक्षण संस्था आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांचा, तर जब्बार पटेल यांच्याकडून ३ लाख आणि यशवंतराव गडाख यांच्याकडून २ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
 
‘नोट ओव्हररुल करण्यात हातखंडा’
सिंहासन चित्रपटासाठी मुख्यमंत्री कार्यालयासह निवासस्थान चित्रीकरणासाठी उपलब्ध करण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रशासनाकडून असे करता येणार नसल्याबाबतची गव्हर्न्मेंट नोट पाठविण्यात आली होती; पण कोणतीही नोट ‘ओव्हररुल’ करण्यात माझा हातखंडा असल्यामुळे मी तो आदेश मानला नाही, असे पवार यांनी सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.

Web Title: ziparya marathi movie sharad pawar