आरटीई प्रवेशासाठी जिल्हा परिषदेमार्फत स्वतंत्र नियमावली जाहीर

RTE.jpg
RTE.jpg

पुणे : लॉकडाउनमुळे मागील तीन महिन्यांपासून रखडलेल्या आरटीई प्रवेश प्रक्रियेला गती देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने स्वतंत्र नियमावली तयार केली आहे. या नियमावलीनुसार ही प्रवेश प्रक्रिया पुर्ण करण्याचा आदेशही सर्व शाळांना देण्यात आला आहे. या नियमावलीमुळे आता जिल्ह्यात पुन्हा एकदा आरटीई प्रवेशांना गती येऊ शकणार आहे. 

देशातील उच्च दर्जाच्या खासगी शाळांमध्ये समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील बालकांना मोफत प्रवेश मिळावा, या उद्देशाने २००९ मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण (आरटीई अॅक्ट) देणारा कायदा केला आहे. तेव्हापासून या आरटीई'अंतर्गत गरीब मुलांना नामवंत खासगी शाळांमध्ये प्रवेश देण्यात येत आहेत. यासाठी सोडत पद्धतीने पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतात.

या प्रवेशासाठी दरवर्षी जानेवारी महिन्यापर्यंत  यासाठी पात्र ठरत असलेल्या बालकांकडून आॅनलाइन प्रवेश अर्ज मागविण्यात येत असतात. यानुसार चालू शैक्षणिक वर्षांतील प्रवेशासाठी यंदाही हे अर्ज मागविण्यात आले होते, असे  जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण सभापती रणजित शिवतरे यांनी सांगितले.

या प्रवेशासाठी प्राप्त झालेल्या एकूण प्रवेश अर्जांमधून लकी ड्रॉद्वारे (सोडत पद्धतीने) प्रवेशासाठी बालकांची निवड करण्यात येते. यानुसार चालू शैक्षणिक वर्षांतील आरटीई प्रवेशाबाबतची सोडत १७ मार्च २०२० लाख काढण्यात आली आहे. मात्र त्यानंतर आठवडाभरातच लॉकडाऊन सुरु  झाले. त्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया रखडली. यावर मार्ग काढण्यासाठी आणि एकही विद्यार्थी या प्रवेशापासून वंचित राहू नये, या उद्देशाने ही खास नियमावली तयार करण्यात आल्याचेही शिवतरे  यांनी सांगितले.

यानुसार निवडण्यात आलेल्या बालकांना पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर आणि ग्रामीण भागातील ९७२ नामवंत शाळांमध्ये मोफत प्रवेश देण्यात येतात. या बालकांच्या प्रवेशाबाबतचे  शैक्षणिक शुल्क राज्य सरकार भरते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आरटीई प्रवेश संक्षिप्त माहिती

- प्रवेशासाठी प्राप्त आॅनलाइन अर्ज  ---- ६२ हजार ९२०.

- एकूण रिक्त जागा ---- १६ हजार ९४९.

- सोडतीद्वारे प्रवेशा निवड झालेली बालके ---- १६ हजार ६१७.

- प्रतिक्षा यादीतील (वेटिंग लिस्ट)  पात्र बालके --- १५ हजार २५.

- 'आरटीई'अंतर्गत दिले जाणारे प्रवेश (टक्केवारीत) --- २५ टक्के.

- प्रवेशासाठीच्या एकूण शाळा --- ९७२.

प्रवेशासाठीची झेडपीची नियमावली 

- शाळांमार्फत मेसेजद्वारे प्रवेशाची तारीख कळवणार.

- प्रवेशासाठी पालकांना शाळेत बोलाविण्याबाबतची तारीख शाळा ठरवणार.

- प्रवेशाबाबतचे वेळापत्रक शाळेच्या प्रवेशद्वारावर लावणार.

- लॉकडाऊनमुळे मूळ गावी गेलेले पालक दिलेल्या तारखेला न आल्यास त्यांना नवीन तारीख द्यावी.

- कोरोना प्रतिबंधित क्षेत्रातील पालकांना नियम शिथिल झाल्यानंतरच शाळेत बोलवावे.

- प्रतिबंधित क्षेत्रातील शाळांनी निर्बंध उठेपर्यंत प्रक्रिया राबवू नये.

- प्रवेशासाठी एकावेळी पाचपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनाच बोलावण्यात यावे.

- शाळेच्या प्रवेशद्वारावर पालकांची तपासणी करण्यात यावी.

- केवळ पालकांनाच प्रवेशासाठी शाळेत बोलवावे. 

- पाल्यांना प्रवेशासाठी शाळेत बोलवू नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com