esakal | झेडपीची पाच हजार कोटींची जमीन
sakal

बोलून बातमी शोधा

ZP  five thousand crore land

जिल्ह्याचा कारभार हाकणाऱ्या जिल्हा परिषदेची महापालिकेच्या हद्दीत तब्बल पाच हजार कोटी रुपयांची जागा आहे. यातील काही जागांवर इमारती उभ्या असून, काही मोकळ्या आहेत. हे एकूण क्षेत्र सुमारे नऊ एकर आहे.

झेडपीची पाच हजार कोटींची जमीन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे-  जिल्ह्याचा कारभार हाकणाऱ्या जिल्हा परिषदेची महापालिकेच्या हद्दीत तब्बल पाच हजार कोटी रुपयांची जागा आहे. यातील काही जागांवर इमारती उभ्या असून, काही मोकळ्या आहेत. हे एकूण क्षेत्र सुमारे नऊ एकर आहे.

कोथरूड, बिबवेवाडी, मार्केट यार्ड, कोरेगाव पार्क, स्टेशन आणि लष्कर परिसरात या जागा आहेत.

ताबा झेडपीचा, मालकी सरकारची
कोरेगाव पार्क परिसरात जिल्हा परिषदेची सुमारे साडेचार एकर जमीन आहे. या जागेवर जिल्हा परिषदेची गोदामे आहेत. परंतु, जागेची मालकी सरकारकडे आहे. सातबारावर मालकाचे नाव सरकार असे आहे. हे नाव हटवून, त्याऐवजी सातबारावर पुणे जिल्हा परिषदेचे नाव लावण्यासाठी प्रशासन १९९० पासून सातत्याने प्रयत्न करीत आहे.

तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यामध्ये मध्यस्थी करीत जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद प्रशासनाने ही जागा ‘फिफ्टी-फिफ्टी’ करून घ्यावी, असा सल्ला दिला होता. परंतु, पुढे मात्र त्यात काहीच सुधारणा झाली नसल्याचे जिल्हा परिषदेतून सांगण्यात आले. 
 

loading image
go to top