हवेली तालुक्यातील शाळांत प्रवेशोत्सव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

फुरसुंगी - हवेली तालुक्‍यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा विद्यार्थी पट वाढण्यासाठी दरवर्षी जूनमध्ये राबविला जात असलेला पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठीचा प्रवेशोत्सव यंदा एक मार्चपासून सुरू करण्यात आला असल्याची माहिती हवेली तालुक्‍याच्या गटशिक्षणाधिकारी ज्योती परिहार यांनी दिली.

फुरसुंगी - हवेली तालुक्‍यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा विद्यार्थी पट वाढण्यासाठी दरवर्षी जूनमध्ये राबविला जात असलेला पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठीचा प्रवेशोत्सव यंदा एक मार्चपासून सुरू करण्यात आला असल्याची माहिती हवेली तालुक्‍याच्या गटशिक्षणाधिकारी ज्योती परिहार यांनी दिली.

जून २०१८मध्ये इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी, यासाठी हवेली तालुक्‍याच्या शिक्षण विभागाच्या वतीने मार्चपासून प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. होळकरवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित केलेल्या प्रवेशोत्सव कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून परिहार बोलत होत्या. हवेली पंचायत समिती सदस्य राजीव भाडळे, शिक्षण विस्ताराधिकारी ज्ञानदेव खोसे, सरपंच मंगल झांबरे, उपसरपंच गणेश कर्हे, भरत झांबरे, केंद्रप्रमुख सुनीता पिसे, मुख्याध्यापिका सुनंदा बोत्रे, भाऊसाहेब झांबरे, चंदुलाल ओसवाल, संगीता कुंभार, सायली झांबरे आदी उपस्थित होते. या वेळी पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे फेटे बांधून फुगे व खाऊवाटप करून स्वागत करण्यात आले.

परिहार म्हणाल्या, ‘‘प्रवेशोत्सवामधून लोकप्रतिनिधी, पालक यांना जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी विकासासाठी राबवल्या जात असलेल्या उपक्रमांची माहिती दिली जात आहे.हवेली तालुक्‍यातील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची सर्वांगीण गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहोत.’’ 

बाबाजी सावंत यांनी प्रास्ताविक केले. सतीश भालेकर यांनी आभार मानले.

यापूर्वी प्रत्येक वर्षी जूनमध्ये शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशोत्सव घेतला जात असे. मात्र बऱ्याच खासगी शाळा पालकांकडून मोठी फी घेऊन मे अखेरपर्यंत मुलांना त्यांच्या शाळेत प्रवेश देतात. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये पहिलीत येणाऱ्या विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होते. त्यामुळे या वर्षी जूनऐवजी एक मार्चपासूनच प्रवेशोत्सव सुरू केला आहे. 
- ज्योती परिहार, गटशिक्षणाधिकारी, हवेली तालुका 

Web Title: zp school admission