बारामती तालुक्यात बहुतांश शाळा बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

सोमेश्वरनगर - राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात प्राथमिक शिक्षक संघासह प्राथमिक शिक्षकांच्या सर्वच संघटना उतरल्या आहेत. स्वतःच्या मागण्याही त्यांनी या आंदोलनात पुढे रेटल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील असंख्य शाळा मंगळवारी बंद होत्या. बारामती तालुक्‍यात तर नव्वद टक्‍क्‍यांपेक्षा जास्त शाळा बंद होत्या. तोडगा न निघाल्यास बुधवारी आणि गुरुवारीही शाळा बंद राहण्याची शक्‍यता आहे.

शंभर पटाच्या शाळांना स्वतंत्र मुख्याध्यापक द्या, पदवीधरांना विनाअट वेतनश्रेणी द्या, बीएलओसह अशैक्षणिक कामांतून मुक्तता करा, पदोन्नतीतून केंद्रप्रमुखांची पदे भरा, ऑनलाइन कामांतून मुक्तता करा, शाळांना पाणी व वीज मोफत द्या, अशा मागण्या शिक्षकांनी पुढे केल्या आहेत. जिल्ह्यातील काही शाळा सकाळी नियमित सुरू झाल्या; परंतु शिक्षक संपात उतरल्याची माहिती पसरताच 

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना परत पाठवत शाळांना कुलूप ठोकले. बारामती तालुक्‍यात ७९८ पैकी तब्बल ७१२ शिक्षक संपावर गेले.

दरम्यान, शिक्षकांनी या संपात उडी घेतल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. मंगळवारी सकाळी पालकांना कल्पना नसतानाच शाळा बंद झाल्याने काहीसा गोंधळ उडाला. संपाचे दिवस भरून काढले जाणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

...तर तीन दिवस शाळा बंद
सरकारी कर्मचाऱ्यांच्या व विशेषतः शिक्षकांच्या प्रश्नांविषयी सरकार उदासीन असल्याने आणि सतत निघणाऱ्या तुघलकी फतव्यामुळे शिक्षण क्षेत्रात असंतोष आहे. सरकारने त्वरित तोडगा न काढल्यास तिन्ही दिवस संपात सहभागी होणार आहोत, अशी प्रतिक्रिया जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली.

Web Title: ZP School Close by Teacher Strike