मंचरला पोषण आहारातील तांदळात आढळले सोनकिडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जुलै 2018

मंचर - येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एकमध्ये पोषण आहारासाठी दिलेल्या तांदळात सोनकिडे आढळले. शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (ता. १४) अचानक भेट देऊन पोषण आहाराची पाहणी केली होती. 

मंचर - येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एकमध्ये पोषण आहारासाठी दिलेल्या तांदळात सोनकिडे आढळले. शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (ता. १४) अचानक भेट देऊन पोषण आहाराची पाहणी केली होती. 

राज्य सरकारकडून दोन दिवसांपूर्वीच तांदूळ व इतर कडधान्याची पोती शाळेत आली आहेत. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वसंतराव बाणखेले, प्रवीण मोरडे, युवराज बाणखेले, मंगेश बाणखेले, जगदीश घिसे, सुरेश निघोट यांनी तांदूळ व कडधान्याची पाहणी केली. सोनकिडे पाहिल्यानंतर त्यांनी तांदळाचा वापर भातासाठी करू नका, अशी सूचना आहार तयार करणाऱ्या बचत गटातील महिलांना दिल्या. ठेकेदाराकडे तांदळाची पोती परत केली जातील, असे वसंतराव बाणखेले यांनी सांगितले.

दरम्यान, असाच निकृष्ट प्रतीचा तांदूळ अन्य शाळांत आल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे.

Web Title: ZP School Nutrician Food rice worms