वाजत-गाजत भरल्या जिल्हा परिषदेच्या शाळा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

पुणे - जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी आजचा शाळेचा पहिला दिवसच खूपच आनंददायी ठरला. ढोलताशांच्या गजरात आणि सनई चौघड्याच्या सुरात शालेय विद्यार्थ्यांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. कुठे बैलगाडी तर कुठे ट्रॅक्‍टरमधून थेट शाळेपर्यंतचा झालेला प्रवास हा विद्यार्थ्यांसाठी शालेय वातावरणात रमण्यासाठी उपयुक्त ठरला. नवागतांचे गुलाबपुष्पाने झालेले स्वागत, मिठाई व चॉकलेटमुळे झालेले गोड तोंड आणि पहिल्याच दिवशी मोफत मिळालेली अगदी नवी कोऱ्या पाठ्यपुस्तकांमुळे विद्यार्थ्यांना सुखद धक्काच बसला. जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रवेशोत्सव घेण्यात आला.

प्रदीर्घ कालावधीच्या उन्हाळी सुट्ट्यानंतर आजपासून जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू झाल्या. आज पहिल्या दिवशी जिल्ह्यातील ठिकठिकाणी ग्रामस्थ, शिक्षक आणि पालक आणि लोकप्रतिनिधींनी नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. काही उत्साही ग्रामस्थांनी सजवलेल्या बैलगाडीतून तर, काहींनी ट्रॅक्‍टरमधून मिरवणुकीने विद्यार्थ्यांना शाळेत सोडले. काही शाळांमध्ये फेटे बांधून विद्यार्थ्यांना शाळेला हजेरी लावली.

बारामती तालुक्‍यातील नीरावागज येथील मदने- डोंबाळेवस्तीतील ग्रामस्थांनी नवीन शिक्षकांना शाळा सुरू करण्यास विरोध केला. ऑनलाइन बदल्यांमध्ये अन्यत्र बदलून गेलेल्या शिक्षकांना परत याच शाळेवर नियुक्ती मिळाल्याशिवाय अन्य कोणालाही ही शाळा उघडू दिली जाणार नाही, असा पवित्रा येथील ग्रामस्थांनी घेतला. दरम्यान, शिक्षकाअभावी जिल्ह्यातील एकही शाळा बंद राहिली नाही. शिक्षक नसलेल्या शाळांसाठी जिल्हा परिषदेने पर्यायी व्यवस्था केली होती, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

Web Title: zp school start