हवेली तालुक्यासाठी झेडपी चार स्वतंत्र समन्वयक अधिकारी नेमणार...

zp pune.jpg
zp pune.jpg

पुणे : हवेली तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी या तालुक्याचे चार भाग करून प्रत्येक भागासाठी प्रत्येकी एक गट विकास अधिकारी नियुक्त केला जाणार आहे. शिवाय दोन नवे कोविड केअर सेंटर सुरु करण्याबरोबरच प्रत्येक गावांसाठी प्रत्येकी एक अँब्युलन्स दिली जाणार आहे. 

सकाळमध्ये आज (ता. ७) प्रसिद्ध झालेल्या 'बेड, व्हेंटिलेटरअभावी महिलेचा मृत्यू'' या शिर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतारे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, आरोग्य सभापती प्रमोद काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी गांभिर्याने दखल घेतली आहे. यानुसार आजपासून तातडीने उपाययोजना करण्यात येणार असल्याचे प्रसाद यांनी सांगितले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, याबाबत कायमस्वरूपी प्रभावी उपाययोजना करण्यासाठी उपाध्यक्ष शिवतारे आणि आरोग्य सभापती काकडे यांनी आज जिल्हा परिषदेत आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. कोरोना रुग्णांच्या बाबतीत यापुढे कसलाही हलगर्जीपणा होणार नाही, याची खबरदारी घेण्यात येईल. यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. यासाठी प्रसंगी खासगी अॅंब्युलन्स भाडे तत्त्वावर घेण्यात येतील, असेही प्रसाद यांनी सांगितले.

'हेल्पलाइनद्वारे रुग्णांची नोंदणी करा'
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची अनेकदा जिल्हा परिषदेला माहिती मिळत नाही. संबंधितांनी तातडीने ग्रामसेवक किंवा सरपंचांना माहिती द्यावी किंवा १८००२३३४१३० या हेल्पलाईनवर फोन करून नोंदणी करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com