Budget 2021: सुपर्ब बजेट! नीती आयोगाचे प्रमुख अमिताभ कांत यांच्याकडून कौतुक

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 February 2021

उतरत्या कळीला लागलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सरकार काय तरतूद करते, याकडे देशाचं लक्ष लागलं होतं.

Union Budget 2021 : केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पाचे सादरीकरण केले. अर्थमंत्री म्हणून त्यांनी सादर केलेले हे तिसरे बजेट आहे. लेदर ब्रिफकेसचा पायंडा मोडून मोदी सरकारने 'वहिखात्या'तून बजेट आणण्याचा प्रघात सुरु केला होता.

हेही वाचा - Budget 2021: आरोग्य बजेटमध्ये तब्बल 137 टक्क्यांची वाढ; कोरोना लसीसाठी मोठा निर्णय

मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पेपरलेस बजेट सादर करण्यात आले आहे. उतरत्या कळीला लागलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सरकार काय तरतूद करते, याकडे देशाचं लक्ष लागलं होतं. आज सकाळी 11 वाजल्यापासून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटच्या सादरीकरणास सुरवात केली. 'आत्मनिर्भर भारतासाठी बजेट' असं या बजेटचं वर्णन अर्थमंत्र्यांकडून करण्यात आलं आहे. 

नीती आयोगाचे प्रमुख अमिताभ कांत यांनी या बजेटचं कौतुक केलं आहे. त्यांनी म्हटलंय की, हे सुपर्ब बजेट आहे. या बजेटद्वारे फक्त कोरोनापूर्व काळातील परिस्थितीला चालना मिळत नाहीये तर येत्या 3-4 वर्षांसाठी सुद्धा हे दिशादर्शक आहे.

यावेळी सरकारने पायाभूत सुविधा आणि मालमत्तेवरील कमाईवर लक्ष केंद्रीत केलं आहे. खासगी क्षेत्राला दीर्घकाळ सामील करुन घ्यायची गरज सरकारकडून व्यक्त होताना दिसून येत आहे.  हे एक व्यवहार्य, विवेकी आणि पुढे नेणारं बजेट आहे. महत्त्वाचं म्हणजे करात कोणतीही छेडछाड केली गेली नाहीये आणि नवीन उपकरही लावण्यात आले नाहीत. अस मत अमिताभ कांत यांनी व्यक्त केलं आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Budget 2021 Amitabh Kant NITI Aayog CEO praised union budget 2021