तुम्हाला जर काही ऑनलाईन खरेदी करायची असेल, तर ती ३१ मे पूर्वीच करून घेणे फायद्याचे ठरणार आहे. कारण, अमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाईटवरून खरेदी करणे आता महागणार आहे. सध्याची मार्केट परिस्थिती आणि मायक्रो इकॉनॉमी फॅक्टर पाहून कंपनीने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
काय आहे निर्णय
अमेझॉनने आपली सेलर फी, कमिशन चार्जेस आणि प्रॉडक्ट रिटर्न फी यांच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. वेबसाईटवर असलेल्या विक्रेत्यांकडून मिळणारी कमिशन आणि फी ही अमेझॉनच्या कमाईचा एक स्त्रोत आहे. ही फी वाढवल्यामुळे वस्तूंच्या किंमती वाढणार आहेत.
या वस्तूंवर होणार परिणाम
इकॉनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या रिपोर्टनुसार भरपूर कॅटेगरीमधील वस्तूंवर या निर्णयाचा परिणाम होणार आहे. कपडे, ब्यूटी प्रॉडक्ट्स, ग्रॉसरी आणि मेडिसिन अशा कॅटेगरीमधील वस्तू या निर्णयामुळे महागणार आहेत.
इतक्या वाढणार किंमती
मिळालेल्या माहितीनुसार, अमेझॉनवर ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या खरेदीवर ५.५ टक्के ते १२ टक्के सेलर फी लागू होणार आहे. तर, ५०० रुपयांहून अधिक खरेदीवर १५ टक्के सेलर फी आकारण्यात येऊ शकते. १००० रुपयांहून अधिक खरेदीवर २२.५ टक्के सेलर फी लागू केली जाऊ शकते.
ब्युटी सेक्शनमध्ये शॉपिंग करत असताना, ३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या उत्पादनांवरील कमीशन चार्जेस ८.५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहेत. तर, घरगुती वापराच्या गोष्टींवरील डिस्ट्रीब्युशन चार्जेसमध्ये २० ते २३ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.
३१ मे पासून या वाढलेल्या किंमती लागू होणार असल्याची माहिती अहवालात दिली आहे. त्यामुळे अमेझॉनवरून काही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर घाई करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.