Save Income Tax: नोकरदारांना इनकम टॅक्स वाचविण्यासाठीचे रामबाण उपाय

how to save tax on salary: यावेळी सॅलरी रिस्ट्रक्चर करत असताना तुम्ही काही पर्यायांचा वापर करुन इनकम टॅक्समध्ये बचत करू शकता
how to save tax on salary
how to save tax on salaryEsakal

How to save tax on salary: एप्रिल महिना हा नोकरदार वर्गासाठी तसा अत्यंत महत्वाचा असतो. कारण सगळ्यांच्या नजरा असतात त्या म्हणजे इन्क्रिमेंटवर Incriment . याचसोबत कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रपोज्ड इन्वेस्टमेंटची माहिती देखील कंपनीला द्यायाची असते.

तसचं नवीन आर्थिक वर्षामध्ये Financial Year अनेक कंपन्या कर्मचाऱ्याना CTC मध्ये बदल करून सॅलरीला रिस्ट्रक्चर करण्याचा पर्याय देत असते. Income Tax Saving Plan your Salary From April

जर तुमची कंपनी देखीसल तुम्हाला असा पर्याय देत असेल तरी ही संधी सोडू नका salary structure. कारण टॅक्स Income Tax वाचवण्यासाठीचा हा योग्य पर्याय आहे.

हा पर्याय केवळ एप्रिल महिन्यातच तुमच्याकडे उपलब्ध असू शकतो. यावेळी सॅलरी रिस्ट्रक्चर करत असताना तुम्ही काही पर्यायांचा वापर करुन इनकम टॅक्समध्ये बचत करू शकता income tax savings. यातील काही पर्यायांसाठी तुम्हाला बिलांची आवश्यकता भासू शकते.

राष्ट्रीय पेन्शन योजनेत गुंतवणूक

NPS म्हणजेच नॅशनल पेन्शन स्किम यामध्ये गुंतवणूक करून नोकरदार वर्ग टॅक्समध्ये बचत करू शकतात. कलम ८० CCD(2) अंतर्गत NPS मध्ये ठेवलेल्या बेसिक सॅलरीच्या १० टक्के पर्यंत टॅक्स लागत नाही.

केवळ १० टक्के कर्मचारीच मात्र या योजनेचा लाभ घेतात. NPS मध्ये वर्षाला ९६ हजारांवर २९, ९५२ रुपये टॅक्स वाचू शकतो. जास्त पगार असलेल्यांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. NPS हा इतर रिटायरमेंट प्लान म्हणजेच PF आणि PPF यांहून अधिक रिटर्न देतं.

लीव्ह ट्रॅव्हल असिस्टंस

CTC मधील लीव्ह ट्रॅव्हल असिस्टंस (LAT) हा पर्याय निवडूनही टॅक्समध्ये बचत करणं शक्य आहे. पगारदार व्यक्तीच्या कुटुंबाच्या प्रवासाच्या भाड्यावर टॅक्स लागत नाही. याचा लाभ घ्यायचा असल्यास तो CTC चा भाग बनवा.

लक्षात ठेवा वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही हा पर्याय निवडू शकता. या पर्यायामुळे तुम्ही वर्षाला ६० हजार रुपयांपर्यंत कर वाचवू शकता.

चल संपत्ती 

जर एखादी कंपनी कर्मचाऱ्याला चल संपत्ती (Movable Assets) खरेदी करण्याची ऑफर देत असेल तर या माध्यमातून मोठी कर बचत होवू शकते.

एखाद्या कर्मचाऱ्याला वैयक्तिक वापरासाठी पुरवलेल्या गॅझेट्स आणि उपकरणांवर एकूण मूल्याच्या 10% कर आकारला जातो. कंप्युटर आणि लॅपटॉपवर मात्र कर लागत नाही. अशा प्रकारच्या संपत्तीवर १८, ७२० रुपयांची टॅक्स बचत होवू शकते. income tax new tax regime

हे देखिल वाचा-

how to save tax on salary
Income Tax: लहान मुलांच्या नावाने आयकर विभाग पाठवतंय नोटीस, काय आहे कारण? जाणून घ्या

ड्रायव्हर सॅलरी

अनेक कंपन्या वरिष्ठ पदावर असलेल्या कर्मचाऱ्यांना ड्रायव्हरचा पर्याय देता. ड्रायव्हरला दिल्या जाणाऱ्या पगाराच्या आधारावर वर्षाला जवळपास १ लाख २० हजार रुपये पगार दाखवून तुम्ही ३७, ४४० रुपये टॅक्स वाचवू शकता. 

इंधन आणि ट्रॅव्हल रीइंबर्समेंट

जर तुम्ही टॅक्सीने ऑफिसला येत असाल तर पूर्ण खर्च रीइंबर्समेंट होवू शकतो. तर एखादा कर्मचारी जर स्वत:ची गाडी किंवा कंपनीच्या गाडीचा वापर कंपनीच्या कामासाठी करत असेल तर मेंटेनेन्स आणि इंधनासाठी रीइंबर्समेंट घेता येणं शक्य आहे. यावर १४, ९७६ इतका टॅक्स वाचवणं शक्य आहे.

इंटरनेट आणि फोन बिल

करोना काळामध्ये इंटरनेट आणि फोन बील रिअंबर्समेंट पर्याय मोठ्या प्रमाणात वापरण्यात आला होता. इंटरनेट आणि फोन बिलच्या रिइंबर्समेंटसाठी तुम्हाला ओरिजनल बिलं जोडणं गरजेचं असतं. या पर्यायाच्या मदतीने तुम्ही ५,६१६ रुपये टॅक्स बचत करू शकता. 

how to save tax on salary
Save Income Tax : कर्ज, विमा, योजनांमध्ये पैसे गुंतवूण Income Tax वाचवता येतो का?

वर्तमानपत्र आणि मासिकं

वर्तमानपत्र आणि मासिकांवरील खर्च देखील टॅक्स फ्री असतात. यासाठी देखील तुम्हाला ओरिजनल बिल जोडावं लागतं. वर्षाला १२ हजार रुपयांचा खर्च दाखवून तुम्ही ३, ७४४ रुपयांचा कर बचत करू शकता.

जेवणाचे कूपन

जेवणाच्या कूपनमधूनही तुम्ही टॅक्स वाचवू शकता. या कूपनच्या मदतीने तुम्ही वर्षाला २६,४०० रुपयांचा खर्च दाखवून ८, २३७ रुपये टॅक्स वाचवू शकता. 

अशा प्रकारे तुम्ही वर्षाच्या सुरुवातीपासूनच टॅक्स वाचवण्यासाठी काही पर्यायांची निवड केली तर वर्षाला कराच्या रुपात भरावी लागणारी एक मोठी रक्कम वाचवणं तुम्हाला शक्य आहे. याशिवाय गृहकर्ज, कार लोन, विमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमधूनही टॅक्स बचत करणं शक्य आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com