
नवी दिल्ली - केंद्र सरकारने आता नऊ कॅरेट सोन्यातील दागिन्यांसाठीही हॉलमार्किंग अनिवार्य केले आहे. यामुळे आता कमी किमतीतील दागिने ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. सोन्याच्या वाढत्या भावाच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण व्यावसायिकांकडून काही काळापासून ही मागणी होत होती. ती पूर्ण झाल्याने व्यावसायिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.