
PM Kisan 13th Installment : 'या' दिवशी जमा होणार पीएम किसानचा 13वा हप्ता; 'हे' करा अन्यथा...
PM Kisan 13th Installment News : पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेचा 13 वा हप्ता जारी करतील अशी अपेक्षा आहे. फेब्रुवारी संपण्यापूर्वीच पीएम किसान सन्मान निधीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.
चार वर्षांपूर्वी 2019 मध्ये, 24 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान किसान योजना सुरू करण्यात आली होती. हे पाहता, काही रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, योजनेचा 13 वा हप्ता 24 फेब्रुवारी रोजी जारी केला जाऊ शकतो.
मात्र याबाबत तूर्तास तरी निश्चितपणे काहीही सांगता येणार नाही, कारण सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
12 वा हप्ता 17 ऑक्टोबर 2022 रोजी दिला होता. यामध्ये सुमारे 80 दशलक्ष शेतकऱ्यांना 16,000 कोटी रुपये देण्यात आले होते.
या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 2019 च्या सुरुवातीला 3.16 कोटींवरून 2022 च्या मध्यापर्यंत 10.45 कोटीपर्यंत वाढणार आहे, असे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी गेल्या आठवड्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितले.
पीएम किसानचा हप्ता कोणाला मिळेल?
13 वा हप्ता प्राप्त करण्यासाठी सर्व PM किसान लाभार्थ्यांनी त्यांचे खाते eKYC पूर्ण करणे आवश्यक आहे. eKYC पूर्ण करण्याची अंतिम मुदत 10 फेब्रुवारी 2023 होती. ज्यांनी eKYC पूर्ण केले नाही. त्यांना पीएम किसानकडून पैसे मिळण्याची आशा नाही.
याप्रमाणे यादीत तुमचे नाव तपासा :
पीएम किसान वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा.
भारताच्या नकाशावरील पिवळ्या रंगाच्या टॅब "डॅशबोर्ड" वर क्लिक करा.
तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा आणि गाव निवडा.
दाखवा बटणावर क्लिक करा.
हप्ता जमा झाला आहे की, नाही ते तपासा
पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://pmkisan.gov.in/.
उजव्या कोपऱ्यात, 'लाभार्थी स्थिती' टॅबवर क्लिक करा.
आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक यापैकी कोणताही एक पर्याय निवडा. याद्वारे तुम्ही तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे की नाही हे तपासू शकता.
पीएम किसान योजना काय आहे?
पीएम-किसान अंतर्गत, सरकार लाभार्थी शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6,000 उत्पन्नाचे समर्थन पुरवते. ती 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिली जाते.
साधारणपणे दर चार महिन्यांनी एकदा हप्ता दिला जातो. त्याची सुरुवात 24 फेब्रुवारी 2019 रोजी झाली. PM KISAN चा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो.
पात्रता अटी काय आहेत :
ज्या शेतकऱ्यांच्या नावे शेतीयोग्य जमीन आहे ते पीएम-किसान योजनेअंतर्गत लाभासाठी पात्र आहेत.
संस्थात्मक जमीनधारक, घटनात्मक पदे असलेले शेतकरी कुटुंबे, राज्य किंवा केंद्र सरकारचे सेवारत किंवा सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये काम करणारे लोक आणि सरकारी स्वायत्त संस्था यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.
याशिवाय, मासिक 10,000 रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेले निवृत्तीवेतनधारक आणि डॉक्टर, अभियंता, वकील इत्यादी या योजनेसाठी पात्र नाहीत.