Tata Group: अंबानीनंतर आता टाटांचीही AI मध्ये एंट्री! 'या' कंपनीशी करणार डील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tata Group

Tata Group: अंबानीनंतर आता टाटांचीही AI मध्ये एंट्री! 'या' कंपनीशी करणार डील

Tata Group: आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात देशातील आघाडीच्या कंपन्या गुंतवणूक करत आहेत. रिलायन्सनंतर आता टाटा समूहही या क्षेत्रात पाऊल टाकत आहे. यापूर्वी अंबानींनी NVIDIA कंपनी सोबत हातमिळवणी केली होती. आता टाटा समूहही या कंपनीशी करार करणार आहे.

मुकेश अंबानींनी 8 सप्टेंबर रोजी घोषणा केली होती

याआधी 8 सप्टेंबर रोजी, मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने यूएस-आधारित चिपमेकर NVIDIA कंपनी सोबत भागीदारी जाहीर केल्यानंतर काही तासांनी, टाटा समूह त्याच यूएस चिपमेकरसोबत भागीदारी करत असल्याचे वृत्त समोर आले.

रॉयटर्सच्या मते, लवकरच हा करार होऊ शकतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्सबाबत टाटा समूह अमेरिकन चिप कंपनी NVIDIA कंपनी सोबत भागीदारीची घोषणा करू शकतो. सध्या त्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स आणि Nvidia यांनी AI भागीदारी जाहीर केली आहे. दोन्ही कंपन्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, एआय आर्किटेक्चर तयार करण्यासाठी कंपन्या एकत्रितपणे काम करतील.

यासह, रिलायन्स इंडस्ट्रीजचे दूरसंचार युनिट रिलायन्स जिओच्या करोडो ग्राहकांसाठी एआय भाषा मॉडेल आणि अॅप्स विकसित करेल.

Nvidia कंपनी काय करते?

Nvidia ही एक अमेरिकन चिप डिझायनिंग आणि AI कंपनी आहे. या कंपनीने 2004 मध्ये भारत आणि जपानमध्ये आपला व्यवसाय सुरू केला. भारतात या कंपनीच्या शाखा गुरुग्राम, हैदराबाद, पुणे आणि बंगलोर येथे आहेत. सध्या या केंद्रांमध्ये 3,800 कर्मचारी काम करत आहेत.