Silicon Valley Bank Crisis : सिलिकॉन व्हॅली बँकेनंतर आता अमेरिकेतील आणखी एक बँक होणार... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Silicon Valley Bank Crisis

Silicon Valley Bank Crisis : सिलिकॉन व्हॅली बँकेनंतर आता अमेरिकेतील आणखी एक बँक होणार...

Silicon Valley Bank Latest Update : सिलिकॉन व्हॅली बँकेचे संकट आता इतर बँकांवरही येऊ शकते. अमेरिकेसह जगभरातील अनेक स्टार्टअप्सना त्याची झळ जाणवू लागली आहे.

दरम्यान, लेहमन ब्रदर्सच्या प्रकरणानंतर संपूर्ण बँकिंग जग हादरले असताना 2008 च्या संकटाची पुनरावृत्ती होणार नाही, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. अशी परिस्थिती टाळण्यासाठी अमेरिकन सरकार आणि अधिकाऱ्यांनी पूर्व तयारी सुरू केली आहे.

अमेरिकेत गेल्या 2 दिवसात 2 बँका कोसळल्या आहेत. सिलिकॉन व्हॅली बँकेच्या दिवाळखोरीनंतर आता अमेरिकेची सिग्नेचर बँकही दिवाळखोर झाली आहे. (Signature Bank becomes next casualty of banking turmoil after Silicon Valley Bank)

गेल्या 2 दिवसात अमेरिकेत 2 बँका बंद पडल्या असून यानंतरही अमेरिकेच्या बाजारात तेजी आहे. ठेवीदारांचे पैसे सुरक्षित असून ते त्यांचे पैसे काढू शकतील, अशी ग्वाही अमेरिकी सरकारने दिली आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, यूएस सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्ह आणि फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स फंड तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. सिलिकॉन व्हॅली बँक दिवाळखोरीनंतर सध्या बिकट अवस्थेत असलेल्या बँकांकडे अधिक ठेवी ठेवण्यासाठी हा निधी वापरता येईल, असे नियामकांना वाटते.

फेडरल रिझर्व्ह आणि फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्प सारख्या नियामकांचा असा विश्वास आहे की असा निधी तयार केल्याने लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल.

हे पाऊल बँकिंग व्यवस्थेवर ठेवीदारांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करेल आणि दहशतीची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यास मदत करेल. यासाठी नियामकांनी बँकिंग जगतातील अनेक अधिकाऱ्यांशी चर्चाही केली आहे.

ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, सिलिकॉन व्हॅली बँकेच्या बुडण्यामुळे विशेषत: भांडवल आणि स्टार्टअपवर लक्ष केंद्रित करणाऱ्या बँकांसाठी परिस्थिती चिंताजनक बनली आहे. सिलिकॉन व्हॅली बँक बुडल्यामुळे अशा इतर बँकांनाही फटका बसत आहे.

फेडरल रिझर्व्ह आणि फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन हे संकट थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि यासाठी पर्यायी निधी योजना तयार करण्यावर भर देण्यात येत आहे.

बिडेन यांनीही माहिती घेतली :

हे प्रकरण इतके गंभीर झाले आहे की अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनाही हस्तक्षेप करावा लागला आहे. बँक बुडल्याची बातमी कळल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूजम यांच्याशी बोलले.

दोघांनी सिलिकॉन व्हॅली बँक बुडवण्याबाबत आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्यासाठी उपाययोजनांबाबत चर्चा केली.