Amazon Layoffs: अ‍ॅमेझॉनचे कर्मचारी चिंतेत, पुन्हा एकदा 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना दिला नारळ, कारण...

जगात मंदीच्या भीतीने, मोठ्या संख्येने कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे.
Amazon Layoffs
Amazon LayoffsSakal

Amazon Layoffs News: जगात मंदीच्या भीतीने, मोठ्या संख्येने कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. आयटी क्षेत्राव्यतिरिक्त इतर क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्याही नोकऱ्या गेल्या आहेत.

ट्विटर ते फेसबुक, टीसीएस आणि गुगल सारख्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. अलीकडेच, Amazon ने आपल्या 18000हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती.

आता पुन्हा Amazon ने कर्मचारी कपात केली आहे. कंपनीने खर्चात कपात करताना व्हिडिओ गेमिंग विभागातील सुमारे 100 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. सॅन दिएगो स्टुडिओ, प्राइम गेमिंग आणि गेम ग्रोथमध्ये काम करणार्‍या लोकांना हा निर्णय मोठा धक्का देणारा आहे.

अमेरिकन कंपनीने याआधीही हजारो लोकांना नोकरीवरून काढून टाकले आहे. आता गेमिंग विभागात काम करणाऱ्या लोकांनाही कर्मचारी कपातीचा त्रास सहन करावा लागणार आहे. (Amazon.com Inc Lays Off about 100 Employees In Its Gaming Divisions)

गेमिंग विभागातील आव्हान

ऍमेझॉनने गेमिंग विभागात केलेल्या गुंतवणुकीसाठी खूप संघर्ष केला आहे. यामध्ये क्राउन चॅनल, ट्विच स्ट्रीमिंग सेवेवर चालणारा एक मनोरंजन कार्यक्रम समाविष्ट आहे. ट्विचने अलीकडेच सुमारे 400 कर्मचाऱ्यांची कपात केली. 2012 मध्ये गेमिंग विभाग सुरू झाला होता.

Amazon Layoffs
Gold Silver Price : सोन्याच्या दराचा ऐतिहासिक विक्रम; चांदीच्या दरातही मोठी वाढ, जाणून घ्या आजचा दर

नवीन प्रकल्पांवर काम सुरू आहे

Amazon ने फक्त एकच गेम रिलीज केला आहे. या गेमचे शीर्षक न्यू वर्ल्ड आहे, ज्याचा खेळाडू बेस लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. कर्मचारी कपात करूनही, सॅन दिएगो स्टुडिओमध्ये एक प्रकल्प वेगाने प्रगती करत आहे.

मात्र, अद्याप या प्रकल्पाची घोषणा झालेली नाही. अॅमेझॉनच्या मॉन्ट्रियलस्थित स्टुडिओमध्येही अशा प्रकल्पावर काम सुरू आहे, ज्याची घोषणा झालेली नाही.

CNBC आणि TrueUp च्या टेक लेऑफ ट्रॅकरच्या अह्वालानुसार, टेक कंपन्यांनी गेल्या वर्षभरात सुमारे 60,000 कामगारांना कामावरून काढून टाकले आहे, तर 2022 पासून पूर्ण औद्योगिक क्षेत्रात जवळपास 3, 00,000 कामगारांना कामावरून कमी केले आहे.

Amazon Layoffs
सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com