
भारतीय रिझर्व्ह बँकेने बंधन बँकेवर नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 44.7 लाख रुपयांचा दंड ठोठावला.
तपासात बँकेने काही कर्मचाऱ्यांना कमिशन दिल्याचे व खात्यांच्या डेटामध्ये छेडछाड केल्याचे आढळले.
आरबीआयने स्पष्ट केले की या कारवाईचा ग्राहकांच्या व्यवहारांवर परिणाम होणार नाही.
Bandhan Bank Faces RBI Action: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) खासगी क्षेत्रातील बंधन बँकेवर तब्बल 44.7 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयने ही कारवाई बँकेने नियमांचे पालन न केल्यामुळे केली आहे.
31 मार्च 2024 पर्यंत बँकेची आर्थिक स्थिती तपासण्यासाठी करण्यात आलेल्या स्टॅट्यूटरी इन्स्पेक्शनमध्ये अनेक अनियमितता उघडकीस आल्या. तपासात बँकेने RBIच्या निर्देशांचे उल्लंघन केले असल्याचे स्पष्ट झाले.