Bank Of Baroda : बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांनो, इकडे लक्ष द्या! 'हे' काम करा अन्यथा होईल मोठे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bank of baroda

Bank Of Baroda : बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांनो, इकडे लक्ष द्या! 'हे' काम करा अन्यथा होईल मोठे नुकसान

Bank Of Baroda Alert : तुम्ही सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणजेच बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. करोडो बँक खातेदारांना 24 मार्च 2023 पर्यंत एक महत्त्वाचे काम पूर्ण करावे लागणार आहे.

जर तुम्ही हे केले नाही तर नंतर तुम्हाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू शकते. बँक ऑफ बडोदा (BoB) ने त्यांच्या खातेदारांना सेंट्रल केवायसी (C-KYC) करून घेण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. जर तुम्ही हे काम पूर्ण केले नसेल तर लगेच बँकेत जाऊन हे काम पूर्ण करा.

बँकेने ट्विट करून माहिती दिली :

आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबद्दल ट्विट करून, बँकेने सांगितले आहे की ज्या ग्राहकांना बँकेने नोटीस, एसएमएस किंवा C KYC साठी बोलावले आहे, त्यांनी बँकेत जाऊन त्यांची KYC कागदपत्रे जमा करावीत.

तुम्हाला हे काम 24 मार्च 2023 पूर्वी करायचे आहे. जर तुम्ही हे काम पूर्ण केले असेल तर या सूचनेकडे दुर्लक्ष करा.

सेंट्रल केवायसी म्हणजे काय? खाते उघडणे, जीवन विमा खरेदी करणे, डीमॅट उघडणे इत्यादी सर्व कामांसाठी ग्राहकांना पुन्हा पुन्हा केवायसी करण्याची गरज नाही. आता फक्त एकदाच केवायसी केल्यावर सर्व कामे पूर्ण करता येतील.

बँक आपल्या ग्राहकांना C-KYC चे रेकॉर्ड डिजिटल स्वरूपात सादर करते. यानंतर, ग्राहकाला वेगवेगळ्या कारणांसाठी केवायसी करण्याची गरज नाही आणि बँकांची माहिती केंद्रीय केवायसीशी जुळते.

हा डेटा जुळवून, बँक किंवा कोणतीही संस्था केवायसी नियमांची पूर्तता झाली की नाही हे शोधते. सेंट्रल केवायसीचे व्यवस्थापन करण्याचे काम CERSAI करते. या प्रकरणात, केवळ या क्रमांकावरून ग्राहकाची केवायसी संबंधित माहिती मिळू शकते.

सेंट्रल केवायसी पूर्ण करण्यात अयशस्वी झाल्यास मोठे नुकसान होऊ शकते :

तुम्ही सेंट्रल केवायसी पूर्ण न केल्यास, तुमचे खाते निष्क्रिय केले जाऊ शकते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही अद्याप हे काम पूर्ण केले नसेल तर ते लवकरात लवकर पूर्ण करा. यामुळे तुम्हाला नंतर त्रास सहन करावा लागणार नाही.