Gold Silver Price: सोने खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा; सोन्याच्या दरात 450 रुपयांची घसरण, जाणून घ्या आजचा दर |Gold Silver Price latest Updates 8 May 2023 Know today's rate in your city | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gold Silver Price

Gold Silver Price: सोने खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा; सोन्याच्या भावात 450 रुपयांची घसरण, जाणून घ्या आजचा भाव

Gold Silver Price: गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या भावात वाढ दिसून येत होती. मात्र आज आंतरराष्ट्रीय बाजाराच्या अनुषंगाने देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या भावत घसरण नोंदवण्यात आली आहे.

22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,008 रुपये तर 24 कॅरेट साठी 62,410 रुपये आहे. (Gold Silver Price update 8 May 2023)

अशा परिस्थितीत तुम्ही कोणत्याही ज्वेलर्सच्या दुकानातून सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करत असाल तर ही दिलासादायक बातमी आहे. सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या भावात घसरण दिसून येत आहे. सोन्याच्या भावात प्रति 10 ग्रॅम 450 रुपयांची घट दिसून आली.

चांदीच्या दरात किलोमागे 800 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे तुम्हाला आज म्हणजेच सोमवारी सोन्या-चांदीचे दागिने घ्यायचे असतील तर आज ज्वेलर्सच्या दुकानात हा भाव राहील. कारण मंगळवारी सराफा बाजार उघडेल, तेव्हाच नवीन भाव जाहीर होतील.

24 कॅरेट सोन्याचा भाव कमी झाल्यानंतर इतर कॅरेटमध्येही बदल दिसून येत आहेत. अशा स्थितीत सराफा बाजारातील सोन्याच्या इतर कॅरेटच्या भावामध्ये ही घट झाली आहे.

22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 56,008 रुपये, 18 कॅरेट सोन्याचा भाव 45,824 रुपये आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव 35,641 रुपये आहे.

चांदीच्या भावातही घट:

चांदीच्या भावातही घसरण झाली आहे आणि त्यात किलोमागे 800 रुपयांची घसरण दिसून आली. रविवार आणि सोमवारी चांदीचा भाव 74,800 रुपये प्रति किलो आहे.

गेल्या शनिवारी चांदीचा भाव 75,500 रुपये किलोवर पोहोचला होता. तर शुक्रवारी त्याची किंमत 75,050 रुपये होती.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी:

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात.

24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

नवा नियम:

केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीच्या नियमांमध्ये बदल करताना 1 एप्रिल 2023 पासून कोणत्याही सोन्याच्या दागिन्यांवर 6-अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (HUID) असणे आवश्यक आहे.

मार्चमध्ये माहिती देताना भारतीय मानक ब्युरो (BIS) ने म्हटले होते की, नवीन आर्थिक वर्षात कोणताही दुकानदार 6 अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) शिवाय सोन्याचे दागिने विकू शकणार नाही.