Gold Silver Price : सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा दर

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत घट दिसून येत आहे.
Gold-Silver rule
Gold-Silver rulesakal

Gold Silver Price on 09 March 2023 : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत घट दिसून येत आहे. त्याचा परिणाम आज भारतीय बाजारांवरही दिसून येत असून सुरुवातीच्या टप्प्यात सलग दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण होत आहे.

गुरुवारी म्हणजेच 09 मार्च 2023 रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 24 कॅरेट सोने 54,855 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​उघडले.

यानंतर त्यात थोडीशी घसरण नोंदवण्यात आली असून सकाळी 11 वाजेपर्यंत तो 54,835 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत आहे. दुसरीकडे, काल सोन्याचा भाव 54,911 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला.

चांदीच्या दरातही घसरण :

चांदीबद्दल बोलायचे तर 09 मार्च रोजी त्यातही घसरण नोंदवली जात आहे. वायदे बाजारात चांदीचा दर आज 61,900 रुपये प्रति किलोवर उघडला आहे.

यानंतर त्यात आणखी घसरण नोंदवण्यात आली असून सकाळी 11 वाजेपर्यंत तो 61,675 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. काल चांदीचा भाव 61,817 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.

जाणून घ्या देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीचे भाव :

  • नवी दिल्ली - 22 कॅरेट सोने 51,050 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 65,450 रुपये प्रति किलो

  • मुंबई- 22 कॅरेट सोने 50,900 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 65,450 रुपये प्रति किलो

  • कोलकाता- 22 कॅरेट सोने 50,900 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 65,450 रुपये प्रति किलो

  • चेन्नई- 22 कॅरेट सोने 51,550 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 67,400 रुपये प्रति किलो

आंतरराष्ट्रीय बाजारात काय स्थिती?

आज आंतरराष्ट्रीय बाजारात, सोने आणि चांदीच्या दोन्ही किंमतींमध्ये घट नोंदवली जात आहे. सोने 0.94 च्या घसरणीसह 1,813.28 डॉलर प्रति औंस वर व्यवहार करत आहे. दुसरीकडे, चांदीमध्ये 0.08 ची घसरण होत आहे आणि ती 20.03 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

Gold-Silver rule
Mutual Fund : तुम्ही Mutual Fund मधील गुंतवणूकीत नॉमिनेशन केले आहे का? नसल्यास लवकर करा, 'ही' आहे शेवटची तारीख

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य

Gold-Silver rule
डेट फंडातही आकर्षक परताव्याची संधी..पण गुंतवणूक करण्यापूर्वी हे वाचा...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com