Gold Silver Price: सोने खरेदीदारांसाठी मोठी बातमी! सोन्या-चांदीच्या भावात वाढ, जाणून घ्या आजचा भाव

सलग तीन दिवस सोन्या-चांदीच्या दरात स्थिरता राहिल्यानंतर आज भावात वाढ होताना दिसत आहे.
Gold Silver Price
Gold Silver PriceSakal

Gold Silver Price: सलग तीन दिवस सोन्या-चांदीच्या दरात स्थिरता राहिल्यानंतर आज भावात वाढ होताना दिसत आहे. आज सोन्या-चांदीची खरेदी-विक्री मंगळवारच्या तुलनेत चढ्या भावाने होईल.

आज, 17 मे रोजी सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 58,100 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 61,010 रुपये झाला आहे. तर चांदी 78,800 रुपये प्रति किलो भावाने विकली जाईल.

सराफा व्यापारी आणि इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचे सदस्य मनीष शर्मा यांनी एका वृत्तपत्राला सांगितले की, सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. चांदीच्या भावात आज 300 रुपयांची वाढ झाली आहे.

आज चांदी 78,800 रुपये प्रति किलो भावाने विकली जाईल. तर काल (मंगळवार) सायंकाळपर्यंत 78,500 रुपये भावाने चांदीची विक्री झाली आहे.

त्यामुळे तुम्हाला आज सोन्या-चांदीचे दागिने घ्यायचे असतील तर आज ज्वेलर्सच्या दुकानात हा भाव राहील. 

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

Gold Silver Price
AI Job Losses: जगभरात नोकर कपात होत असताना Zerodha CEO म्हणतात, आम्ही कोणालाही कामावरुन...

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

नवा नियम:

केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीच्या नियमांमध्ये बदल करताना 1 एप्रिल 2023 पासून कोणत्याही सोन्याच्या दागिन्यांवर 6-अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (HUID) असणे आवश्यक आहे.

मार्चमध्ये माहिती देताना भारतीय मानक ब्युरो (BIS) ने म्हटले होते की, नवीन आर्थिक वर्षात कोणताही दुकानदार 6 अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) शिवाय सोन्याचे दागिने विकू शकणार नाही.

Gold Silver Price
Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com