Gold Silver Rate: सोन्याच्या भावात वाढ, चांदीही महागली, जाणून घ्या काय आहे आजचा भाव

देशांतर्गत सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या भावात वाढ झाली आहे.
Gold Silver Rate
Gold Silver RateSakal

Gold Silver Rate: आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच फ्युचर्स मार्केटमध्ये, शुक्रवार, 02 जून 2023 रोजी सोने आणि चांदी तेजीसह व्यवहार करत आहेत.

आज सोने 60,275 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर उघडले आहे. यानंतर सोन्याच्या किंमतीत आणखी वाढ नोंदवण्यात आली आहे. सोन्याबरोबरच आज चांदीच्या दरातही वाढ होत आहे. फ्युचर्स मार्केटमध्ये आज चांदी 72,999 रुपये प्रति किलो वर उघडली आहे.

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

  • दिल्ली - 61,250 रुपये

  • चेन्नई- 61,505 रुपये

  • कोलकत्ता - 61,150 रुपये

  • लखनऊ - 61,150 रुपये

  • मुंबई - 61,100 रुपये

  • पुणे - 61,100 रुपये

  • नागपूर - 61,100 रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी :

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

Gold Silver Rate
Aadhaar Card: आधारशी संबंधित 'ही' तीन महत्त्वाची कामे जूनमध्येच करा पूर्ण, अन्यथा...

हॉलमार्क (Hallmark):

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी.

सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

नवा नियम:

केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीच्या नियमांमध्ये बदल करताना 1 एप्रिल 2023 पासून कोणत्याही सोन्याच्या दागिन्यांवर 6-अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (HUID) असणे आवश्यक आहे.

मार्चमध्ये माहिती देताना भारतीय मानक ब्युरो (BIS) ने म्हटले होते की, नवीन आर्थिक वर्षात कोणताही दुकानदार 6 अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) शिवाय सोन्याचे दागिने विकू शकणार नाही.

Gold Silver Rate
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com