Passenger Vehicles : सरकारचा मोठा निर्णय, 1 ऑक्टोबर 2024 पासून वाहनांसंबंधित हा नियम होणार लागू; जाणून घ्या

परिवहन मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे.
Passenger Vehicles
Passenger Vehiclessakal

Fitness Certificate for Vehicles: जुन्या वाहनांपासून लवकरच सुटका होणार आहे. परिवहन मंत्रालयाने 1 ऑक्टोबर 2024 पासून सर्व वाहनांसाठी फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. यासाठी परिवहन मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे. यावर 30 दिवसांत सर्व संबंधितांकडून सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत.

1 ऑक्टोबर 2024 पासून सर्व वाहनांसाठी फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य असेल. परिवहन मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली. जुन्या वाहनांच्या दिशेने सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे.

MoRTH ने प्रस्तावित केले होते की अवजड माल आणि प्रवासी गाड्यांसाठी फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक असेल. तसेच, इतर सर्व मोटार वाहनांसाठी 1 जून 2024 ही तारीख निश्चित करण्यात आली होती.

MoRTH ने अधिसूचना जारी करून तारीख वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन तारीख 1 ऑक्टोबर 2024 असेल. त्यावर सर्व संबंधितांच्या सूचना व हरकतींचा विचार करून निर्णय घेतला जाईल.

1 एप्रिल 2023 पासून 15 वर्षांपेक्षा जुनी 9 लाख सरकारी वाहने रद्द होणार आहेत. ही वाहने रस्त्यावर धावणार नाहीत. सरकारने आता 15 वर्षांपेक्षा जुन्या 9 लाखांहून अधिक वाहनांना रद्दीमध्ये टाकण्यास मंजुरी दिली आहे.

Passenger Vehicles
LPG Price : आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी बातमी, LPG गॅस सिलेंडर झाला स्वस्त, किंमतीत मोठी घट

यासोबतच प्रदूषण करणाऱ्या बस आणि कारच्या रस्त्यावरील वाहतुकीवर बंदी घालून त्याऐवजी नवीन वाहने घेण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.

15 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांची नोंदणी रद्द :

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 1 एप्रिलपासून सर्व 15 वर्षे जुन्या केंद्र आणि राज्य सरकारी वाहनांची नोंदणी रद्द केली जाईल . यामध्ये परिवहन महामंडळे आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये असलेल्या वाहनांचा समावेश आहे.

Passenger Vehicles
महिलांनो तरुणपणी घेतलेली जमीन उतारवयात होईल आधार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com