LIC Chairman : अदानी प्रकरणानंतर सरकारचा मोठा निर्णय; LIC मध्ये केला मोठा बदल

LIC ने अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये 30,127 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
LIC New Chairman
LIC New ChairmanSakal

LIC New Chairman : सरकारने सरकारी मालकीची विमा कंपनी LIC चे नवीन अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती यांच्या नावाला मंजुरी दिली आहे.

अहवालानुसार, एलआयसी हाउसिंग फायनान्सचे सीईओ आणि एमडी सिद्धार्थ मोहंती यांना 3 महिन्यांसाठी एलआयसी अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

सिद्धार्थ मोहंती हे LIC हाउसिंग फायनान्सचे MD म्हणून कायम राहतील, असे बिझनेस टुडेच्या वृत्तात म्हटले आहे. त्यांचा हंगामी अध्यक्ष म्हणून कार्यकाळ 14 मार्च 2023 पासून सुरू होत आहे.

सिद्धार्थ मोहंती यांना 1 फेब्रुवारी 2021 रोजी LIC चे MD बनवण्यात आले. त्यानंतर त्यांनी टीसी सुशील कुमार यांची जागा घेतली होती. (LIC chairman MR Kumar doesn’t get extension; govt appoints Siddhartha Mohanty as interim chief for 3 months)

नवीन अध्यक्षांचा निर्णय अशा वेळी आला आहे जेव्हा एलआयसी अदानी समुहातील गुंतवणुकीच्या चौकशीत आहे. LIC ने अदानी ग्रुपच्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये 30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

मंगलम रामसुब्रमण्यम कुमार यांचा कार्यकाळ दोनदा वाढवण्यात आला :

मंगलम रामसुब्रमण्यम कुमार यांची मार्च 2019 मध्ये LIC चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. याआधी ते कंपनीत दिल्लीचे झोनल मॅनेजर म्हणून कार्यरत होते.

अध्यक्ष झाल्यानंतर, एमआर कुमार यांचा कार्यकाळ जुलै 2021 रोजी संपत होता, जो सरकारने मार्च 2022 पर्यंत 6 महिन्यांनी वाढवला होता.

यानंतर मार्च 2022 मध्ये त्यांचा कार्यकाळ आणखी एक वर्षाने मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आला. त्यांच्या कार्यकाळातच LIC शेअर बाजारात सूचिबद्ध झाली होती.

LIC New Chairman
MCLR Hike : आता 'या' सरकारी बँकेने दिला ग्राहकांना झटका, वाढवले कर्जाचे दर, भरावा लागणार जास्त EMI

LIC ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे आणि जीवन विमा प्रीमियम्स (GWP) च्या बाबतीत जगातील पाचव्या क्रमांकाची जीवन विमा कंपनी आहे. एकूण मालमत्तेनुसार ही जगातील दहावी सर्वात मोठी विमा कंपनी आहे.

भारतीय बाजारपेठेतील दुसऱ्या सर्वात मोठ्या जीवन विमा कंपनीशी तुलना केली असता, LIC कडे जगभरातील शीर्ष 7 बाजारपेठांमधील बाजारातील सर्वात मोठे मार्केट शेअर मार्जिन आहे.

कंपनीकडे 13.35 लाख एजंट आणि सेवा पॉलिसी आहेत ज्यांची किंमत 27.80 कोटी आहे, ज्यामुळे LIC कंपनी जागतिक स्तरावर तिसरी सशक्त विमा ब्रँड कंपनी बनली आहे.

LIC New Chairman
नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com