Marriage Loan : लग्नासाठी पैसे नसेल तर आता EMI वर करा लग्न, जाणून घ्या, 'Marry Now, Pay Later' फॅसिलिटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marriage Loan

Marriage Loan : लग्नासाठी पैसे नसेल तर आता EMI वर करा लग्न, जाणून घ्या, 'Marry Now, Pay Later' फॅसिलिटी

Marriage Loan : जर तुम्ही लग्न करण्याचा विचार करत असाल पण पुरेसा पैसा नसेल तर काळजी करू नका कारण आता एक नवीन फॅसिलिटी आली आहे. या फॅसिलिटीच्या माध्यमातून तुम्ही पैसा नसताना धुमधडाक्यात लग्न करू शकता.

अनेकजण मुलीच्या लग्नासाठी आपल्या आयुष्यभराची पुंजी कामाला लावतात तर काहीजण लग्नासाठी कर्ज घेत कर्जबाजारी होतात. कारण पैशाशिवाय लग्न हे अशक्य असतं. लग्न म्हटलं की पैसा हा आलाच. पण तुम्हाला माहिती आहे का तुम्ही पैसा नसतानाही लग्न करू शकता. चला तर जाणून घेऊया कसं? (Marriage Loan do marriage wedding on EMI read Marry Now Pay Later facility)

लग्नासाठी तुमच्याकडे पैसा नसेल तर तुम्ही EMI वर लग्न करू शकता. तुम्ही म्हणाल, हे कसं शक्य आहे? पण हे खरंय. 'Marry Now, Pay Later' फॅसिलिटीच्या मदतीने तुम्ही लग्न करू शकता.

आतापर्यंत तुम्ही EMI वर ऑनलाइन शॉपिंग, घर, सोने, गाडी किंवा वस्तू खरेदी केले असतील पण आता बाय नाऊ पे लेटर फॅसिलिटीमुळे तुम्ही EMI वर लग्नही करू शकता.

जाणून घ्या, 'Marry Now, Pay Later' फॅसिलिटी

मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, फिनटेक कंपनी Sankash ने या सुविधेसाठी रेडिसन हॉटेल सोबत करार केला आहे. कंपनीच्या मते, येत्या दिवसात ही फॅसिलिटी संपुर्ण देशात सुरु करण्याचा प्लॅन सुरू आहे. या फॅसिलिटीमध्ये वेडींग स्पेस रेडिसन हॉटेलमध्ये मिळणार. कंपनीचा विचार एमएनपीएल (MNPL) स्कीमला संपुर्ण देशात सुरू करण्याचा आहे.

Sankash चे सीइओ आणि को-फाउंडर आकाश दहियांच्या मते, आता पर्यंत त्यांच्याकडे फ्लाय नाउ, पे लेटर होतं त्यानंतर त्यांच्याकडे सेल नाऊ पे लेटर होतं. आता त्यांनी रेडिसन सोबत मिळून स्टे नाउ पे लेटरची सुविधा सुरू केली आहे. ।

केव्हा सुरू होणार ही सुविधा

कंपनीच्या मते, ही सुविधा संपुर्ण देशात सुरू करण्याची प्लॅनिंग सुरू आहे. या वर्षाच्या शेवटपर्यंत ही फॅसिलिटी रेडिसनच्या सर्व हॉटेलमध्ये सुरू होणार. कंपनीनुसार या स्किमद्वारे कोणताही व्यक्ती जास्तीत जास्त 25 लाखापर्यंत फंड घेऊ शकतो. या फंडला ६ ते १२ महिने महिन्यात परत करण्याचा वेळ दिला जातो.