Hurun Global Rich: जगातील टॉप 10 श्रीमंतांमध्ये मुकेश अंबानी एकमेव भारतीय, गौतम अदानी 'या' स्थानावर |Mukesh Ambani Only Indian In Top 10 Hurun Global Rich List, Gautam Adani Slips To 23 Rank, 15 New Billionaires | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mukesh Ambani only Indian in top 10 Hurun Global Rich List, Gautam Adani slips to 23 rank, 15 new billionaires

Hurun Global Rich: जगातील टॉप 10 श्रीमंतांमध्ये मुकेश अंबानी एकमेव भारतीय, गौतम अदानी 'या' स्थानावर

Hurun Global Rich List 2023 : गेल्या काही महिन्यांत गौतम अदानी नेटवर्थमध्ये झालेल्या तीव्र घसरणीचा फायदा रिलायन्स इंडस्ट्रीज मुकेश अंबानी यांनाही झाला आहे. यामुळे मुकेश अंबानी पुन्हा भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

इतकंच नाही तर आता जगातील 10 श्रीमंत व्यक्तींमध्ये ते एकमेव भारतीय आहेत. हुरुनच्या श्रीमंतांच्या ताज्या यादीत ही माहिती समोर आली आहे. (Mukesh Ambani only Indian in top 10 Hurun Global Rich List, Gautam Adani slips to 23 rank, 15 new billionaires)

आशियातील सर्वात श्रीमंत :

रिसर्च प्लॅटफॉर्म Hurun ने रिअल इस्टेट कंपनी M3M च्या सहकार्याने श्रीमंतांची यादी प्रसिद्ध केली आहे. 2023 M3M Hurun ग्लोबल रिच लिस्ट नुसार, मुकेश अंबानी हे केवळ भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती नाहीत तर जगातील 10 सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते एकमेव भारतीय देखील आहेत.

अदानींची संपत्तीत घट :

या यादीनुसार मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती आता 82 अब्ज डॉलर्स आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे गेल्या वर्षी हुरुनच्या यादीत भारतीय श्रीमंतांमध्ये पहिल्या क्रमांकावर होते, तर मुकेश अंबानी त्यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर होते.

Hurun Global Rich List 2023

Hurun Global Rich List 2023

गेल्या वर्षीच्या यादीनुसार, गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 130 अब्ज डॉलर इतकी होती. मात्र, आता त्यांची एकूण संपत्ती 53 अब्ज डॉलरवर आली आहे. निव्वळ संपत्तीत अर्ध्याहून अधिक घट होऊनही गौतम अदानी हे दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत भारतीय आहेत.

हुरुनच्या श्रीमंतांच्या यादीनुसार, सायरस पूनावाला हे भारतातील तिसरे मोठे श्रीमंत आहेत. त्यांची एकूण संपत्ती 28 अब्ज डॉलर एवढी आहे. कोविड महामारीच्या काळात सायरस पूनावाला यांना खूप फायदा झाला आहे.

त्यांची कंपनी सीरम इन्स्टिट्यूटने कोरोना महामारीच्या काळात मोठ्या प्रमाणात कोविड लसींची निर्मिती केली. त्यांच्या कंपनीने भारताला लसींचा पुरवठा केला आहे, त्यासोबतच त्यांच्या कंपनीने बनवलेली लस जगातील अनेक देशांमध्ये पोहोचली आहे.

पाचव्या स्थानावरही कोण?

सायरस पूनावाला गेल्या वर्षीच्या हुरुनच्या यादीत तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत भारतीय होते. ताज्या यादीत शिव नाडर आणि त्यांच्या कुटुंबाला चौथ्या क्रमांकावर ठेवण्यात आले आहे. हुरुनच्या मते, नाडर कुटुंबाची सध्याची एकूण संपत्ती 27 अब्ज डॉलर आहे.

गेल्या वर्षीही नाडर कुटुंब चौथ्या क्रमांकावर होते. स्टील किंग म्हणून प्रसिद्ध असलेले लक्ष्मी मित्तल 20 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह पाचव्या स्थानावर आहेत. गेल्या वर्षी राधाकिशन दमाणी पाचव्या क्रमांकावर होते.