Mukesh Ambani : अंबानींचा विषयचं हार्ड, ड्रायव्हरचा पगार ऐकून बसेल धक्का, म्हणाल,... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salary of Mukesh Ambani's Driver

Mukesh Ambani : अंबानींचा विषयचं हार्ड, ड्रायव्हरचा पगार ऐकून बसेल धक्का, म्हणाल,...

Salary of Mukesh Ambani's Driver : देशातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या संपत्तीबद्दल तुम्ही खूप वाचले असेल. पण तुम्हाला मुकेश अंबानी यांच्या ड्रायव्हरचा पगार माहित आहे का? अंबानी यांच्या ड्रायव्हरचा पगार पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, सन 2017 मध्ये मुकेश अंबानींच्या वैयक्तिक ड्रायव्हरचा पगार दरमहा सुमारे 2 लाख रुपये होता. लाइव्ह मिंटच्या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

अंबानींच्या ड्रायव्हरचा वार्षिक पगार 24 लाख रुपये होता. हा पगार बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांच्या पगारापेक्षा जास्त आहे. पण मुकेश अंबानींच्या ड्रायव्हरचे 2023 सालातील सॅलरी पॅकेज काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 2017 नंतर त्यात नक्कीच वाढ झाली असेल.

अंबानी कुटुंबातील चालक खासगी कंत्राटी फर्मच्या माध्यमातून कामावर घेतले जातात अशी माहिती आहे. ड्रायव्हिंग कर्मचार्‍यांनाही अंबानी कुटुंबाच्या भव्य जीवनशैलीनुसार कठोर प्रशिक्षण घ्यावे लागते. या चालकांना अंबानींची बुलेटप्रूफ वाहने चालवावी लागतात.

त्यामुळे हे चालक व्यावसायिक आणि लक्झरी वाहने चालवण्यात माहीर असतात. प्रतिकूल परिस्थितीत गाडी चालवण्यात आणि खराब रस्त्यांवर वाहन चालवण्यातही ते पटाईत असतात. वृत्तानुसार, अंबानी कुटुंबातील स्वयंपाकी, गार्ड आणि हाउसकीपिंग कर्मचार्‍यांना इतर भत्ते आणि विमा देखील दिला जातो.

यांचा पगारही जाणून घ्या :

सेलिब्रिटींच्या ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड्सचे पगार चर्चेत असतात. सलमान खान आणि अक्षय कुमार यांसारखे अनेक सेलिब्रिटी आपल्या बॉडीगार्डला करोडोंचे मानधन देतात.

मिंटच्या वृत्तानुसार, सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा, जो त्याच्यासोबत 20 वर्षांपासून आहे, दरवर्षी 2 कोटी रुपये मानधन घेतो.

करीना कपूर आपल्या मुलांची काळजी घेणाऱ्या आयाला दरमहा 1.50 लाख रुपये मानधन देते. हे ओव्हरटाइमसाठी 1.75 लाख रुपयांपर्यंत जाते. अक्षय कुमारच्या बॉडीगार्ड श्रेयसबद्दल सांगायचे तर तो दरवर्षी 1.2 कोटी रुपये मानधन घेतो.