
Nirmala Sitharaman: फायनान्शिअल इन्फ्लुएंसरबाबत निर्मला सीतारामन यांचा सूचक इशारा; म्हणाल्या, नियमन...
Nirmala Sitharaman: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आर्थिक प्रभाव टाकणाऱ्यांबद्दल (इन्फ्लुएंसर) सूचक इशारा दिला आहे.
बेंगळुरू येथे एका कार्यक्रमात बोलताना अर्थमंत्र्यांनी सांगितले की, गुंतवणूक आणि बचतीबाबत योग्य सल्ला देणारे काही खरे तज्ज्ञ असले तरी, लोकांची दिशाभूल करणारे किंवा मोठा परतावा देण्याचे आश्वासन देऊन त्यांना संशयास्पद अॅप्समध्ये फसवणारे अनेकजण आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, सध्या सोशल मीडियावरील आर्थिक प्रभाव टाकणाऱ्यांबद्दल कोणताही नियमन करण्याचा प्रस्ताव नाही.
कर्नाटकच्या तुमाकुरू जिल्ह्यातील एका कार्यक्रमाला संबोधित करताना, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन सोशल मीडियावर आर्थिक सल्ला देणाऱ्या प्रभावशाली लोकांवर कारवाई करण्याचा विचार करत आहेत का? असे विचारले असता.
त्या म्हणाल्या की सरकारकडे असा कोणताही प्रस्ताव नाही. मात्र, त्यांनी लोकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
सीतारामन म्हणाल्या की या विषयावर आम्ही आयटी मंत्रालय आणि आरबीआय सोबत काम करत आहोत.
सोशल मीडियावर आर्थिक सल्ला देणाऱ्यांबाबत, सीतारामन यांनी लोकांना अशा प्लॅटफॉर्मवर सल्ल्या दिलेल्या प्रत्येक गोष्टीचे पालन करताना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला, कारण लोकांच्या कष्टाने कमावलेला पैसा आहे त्याचे नुकसान होऊ नये.
फसव्या अॅप्सवर कारवाई करण्यासाठी आणि आर्थिक घोटाळ्यांपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी वित्त मंत्रालय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) सोबत काम करत आहे.
अलिकडच्या काही महिन्यांत अनेक टेलीग्राम चॅनेल आणि YouTube खाती सशुल्क स्टॉक टिप्स ऑफर करण्यासाठी तपासण्यात आली आहेत.
काही इन्फ्लुएंसर यांनी विशिष्ट स्टॉकच्या किंमती कृत्रिमरित्या वाढवल्या आणि नंतर ते स्टॉक नफ्यात विकले, ज्यामुळे त्यांच्या फॉलोअर्सचे नुकसान झाले.
भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड आणि देशाचे भांडवल बाजार नियामक, हे रोखण्यासाठी आणि गुंतवणूकदारांना जोखमींबद्दल शिक्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.