NPS Calculator: NPS मध्ये 'या' वयापासून गुंतवणूक केल्यास मिळतील 1 कोटी, दरमहा मिळेल 1 लाख पेन्शन|NPS scheme Retire as a crorepati and get Rs 1 lakh pension every month | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NPS Calculator

NPS Calculator: NPS मध्ये 'या' वयापासून गुंतवणूक केल्यास मिळतील 1 कोटी, दरमहा मिळेल 1 लाख पेन्शन

NPS Calculator: NPS म्हणजेच नॅशनल पेन्शन सिस्टीम ही सेवानिवृत्त निधी तयार करण्यासाठी सर्वात लोकप्रिय योजना आहे. NPS मध्ये गुंतवणूक करून, तुम्ही खूप मोठा निधी तयार करु शकता आणि वृद्धापकाळातही तुम्ही निवांत जीवन जगू शकता.

जर तुम्ही तुमचे निवृत्तीचे नियोजन करत असाल तर NPS मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे तुमच्या मासिक उत्पन्नाचा स्रोत निवृत्तीनंतरही कायम राहील.

परंतु एनपीएसचा हा एकमेव फायदा नाही. यातून तुम्ही करोडपती देखील होऊ शकता. तुम्ही योग्य वेळी योग्य मार्गाने NPS मध्ये गुंतवणूक केली तर तुम्ही 1 कोटीचा फंड तयार करू शकता.

NPS मध्ये 1 कोटीचा निधी कसा तयार करायचा?

समजा तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षापासून या योजनेत गुंतवणूक करायला सुरुवात केली. यामध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये गुंतवावे लागतील. वयाच्या 75 वर्षापर्यंत तुम्ही या योजनेत गुंतवणूक करत राहू शकता.

तर तुमची एकूण गुंतवणूक 45 वर्षांची होते. NPS ने गेल्या काही वर्षात 9-10% परतावा दिला आहे. 10% परतावा गृहीत धरल्यास आणि वार्षिकीमध्ये 40% गुंतवणूक करा (एनुइटी दर 6% गृहीत धरला जातो) तर निवृत्तीनंतर तुमच्या पेन्शन खात्याची स्थिती खालील प्रमाणे असेल

- एकूण कॉर्पस - 5,28,49,280

- एकूण गुंतवणूक - 2,70,0000

पेन्शन कॉर्पस किती असेल?

इतक्या गुंतवणुकीनंतर तुमचा पेन्शन फंड असेल-

- वार्षिकी मूल्य - 2,11,39,712

- एकरकमी मूल्य - 3,17,09,568

म्हणजेच तुम्हाला एका महिन्यात 1,05,699 रुपये पेन्शन मिळेल.

NPS चे अनेक फायदे आहेत:

पेन्शन नियामक PFRDA (पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी) नुसार, NPS ने ग्राहकांना बाजारानुसार चांगला परतावा दिला आहे तसेच गेल्या दशकात ग्राहकांना कर सूट दिली आहे.

या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 2 लाखांपर्यंत थेट कर सूट मिळते. त्याची कमी किंमतीची वैशिष्ट्ये तुम्हाला एक कॉर्पस तयार करण्यात मदत करतात ज्यामुळे तुम्हाला जास्त पेन्शनची रक्कम मिळते.