Government Scheme | एका कुटुंबात किती जणांना मिळतो पीएम किसान योजनेचा लाभ ? PM kisan yojana rules government scheme for farmers | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM kisan yojana

Government Scheme : एका कुटुंबात किती जणांना मिळतो पीएम किसान योजनेचा लाभ ?

मुंबई : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा १४वा हप्ता मे महिन्यात येण्याची शक्यता आहे. याचा लाभ कोणाला मिळणार हे येथे जाणून घेऊ या.

शासनाकडून लोकांसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे हे पाहण्याची जबाबदारीही सरकारची आहे. यामध्ये शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचाही समावेश आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६ हजार रुपये जमा केले जातात.

परंतु, एका कुटुंबातील किती शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो, हे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे. त्यासाठी सरकारने स्पष्ट माहिती दिली आहे. (PM kisan yojana rules government scheme for farmers ) हेही वाचा - संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

या योजनेंतर्गत सरकार अल्प आणि अत्यल्प शेतकरी कुटुंबांना वार्षिक ६ हजार रुपये देणार आहे. याअंतर्गत हे ६ हजार रुपये एका वर्षात तीन हप्त्यांमधून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ संपूर्ण शेतकरी कुटुंबाला दिला जातो. या कुटुंबात पती, पत्नी व त्यांची मुले या योजनेत ठेवण्यात आली आहेत. यामध्ये पती-पत्नी दोघांनाही स्वतंत्रपणे या योजनेचा लाभ द्यावा, असा कोणताही नियम नाही.

या योजनेशी संबंधित तीन हप्त्यांचे पैसे एप्रिल ते जुलै, ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि डिसेंबर ते मार्च दरम्यान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. आता सरकारच्या पीएम किसान योजनेअंतर्गत १४ वा हप्ता या मे महिन्यात येण्याची शक्यता आहे.

pmkisan.gov.in वर जाऊन शेतकरी या १४व्या हप्त्याची स्थिती तपासू शकतात. या लिंकवर गेल्यानंतर लाभार्थी स्थिती या पर्यायावर जाऊन पुढील हप्त्याचे अपडेट जाणून घेता येईल.