RBI Action: महिंद्र सर्व्हिसेसह अनेक वित्तीय संस्थांवर रिझर्व्ह बँकेने ठोठावला कोटींचा दंड, जाणून घ्या कारण |RBI imposes penalty on Mahindra Financial Services, Indian Bank for non-compliance with norms | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RBI

RBI Action: महिंद्र सर्व्हिसेसह अनेक वित्तीय संस्थांवर रिझर्व्ह बँकेने ठोठावला कोटींचा दंड, जाणून घ्या कारण

RBI Penalty: भारतीय रिझर्व्ह बँकेने महिंद्रा आणि महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडवर मोठा दंड ठोठावला आहे. या वित्तीय संस्थेवर RBI कडून (RBI Action on Financial Institution) 6.77 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

RBI च्या आर्थिक नियमांचे पालन न केल्यामुळे महिंद्रावर हा दंड ठोठावण्यात आला आहे. ग्राहकांना कर्ज देताना व्याजदर जाहीर केले नाहीत, हे आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन आहे. (RBI imposes penalty on Mahindra Financial Services, Indian Bank for non-compliance with norms)

यानंतर रिझर्व्ह बँकेने या वित्तीय संस्थेवर कारवाई करत 6.77 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. या प्रकरणावर एक निवेदन जारी करताना, आरबीआयने म्हटले आहे की 31 मार्च 2019 ते 31 मार्च 2020 दरम्यान महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेसची तपासणी करण्यात आली.

RBI च्या तपासात काय आढळले?

महिंद्रा अँड महिंद्राने ग्राहकांना कर्ज देताना व्याजदर जाहीर करण्याच्या नियमांचे योग्य प्रकारे पालन केले नाही, असे रिझर्व्ह बँकेच्या तपासणीत आढळून आले.

यासोबतच नियमांमध्ये बदल केल्यानंतर कंपनीने ग्राहकांना माहितीही दिली नाही. यानंतर आरबीआयने नियमांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल कंपनीला 6.77 कोटी रुपयांचा मोठा दंड ठोठावला.

इंडियन बँकेलाही दंड ठोठावला :

महिंद्र अँड महिंद्रा फायनान्शिअल सर्व्हिसेस व्यतिरिक्त, रिझर्व्ह बँकेने इंडियन बँकेला 55 लाख रुपयांचा मोठा दंड ठोठावला आहे. बँकेने आरबीआयच्या केवायसीशी संबंधित नियमांचे उल्लंघन केले होते.

त्यानंतर बँकेवर कारवाई करताना आरबीआयने 55 लाखांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय, NBFC फसवणुकीशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने मुथूट मनी लिमिटेडवर कारवाई करताना 10.50 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

टॅग्स :BankBusinessrbi