
RBI Decision on 2000 Note : दोन हजाराची नोट का रद्द केली? अखेर RBI ने दिले स्पष्टीकरण
मुंबई : सन २०१६ च्या नोटबंदीनंतर पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेतल्यामुळे लोकांना व्यवहार करण्यासाठी तातडीने दोन हजार रुपयांच्या या नोटा चलनात आणल्या होत्या. मात्र कालांतराने चलनात इतर नोटा पुरेशा संख्येने आल्यामुळे आता दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्यात आल्या आहेत, असे स्पष्टीकरण रिझर्व बँकेने दिले आहे.
चलनात इतर नोटा (दहा रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंत) पुरेशा संख्येने आल्यामुळे दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई देखील २०१८ नंतर थांबवली होती. यातील बऱ्याचश्या नोटा २०१७ पूर्वी छापल्याने त्यांचे आयुष्यही संपत आले होते. तसेच या नोटा चलनात फार मोठ्या प्रमाणावर वापरल्या जात नव्हत्या, असेही ध्यानात आले होते. त्यामुळे क्लीन नोट पॉलिसीनुसार या नोटा रद्द करण्यात आल्याचे रिझर्व बँकेने म्हटले आहे. लोकांना चांगल्या दर्जाच्या नोटा मिळाव्यात ही रिझर्व बँकेची क्लीन नोट पॉलिसी आहे.
येत्या ३० सप्टेंबर पर्यंत लोक या नोटांच्या साह्याने परस्परांमध्ये व्यवहार करू शकतात. मात्र त्यांनी शक्यतो या नोटा आपल्या बँक खात्यात भराव्यात किंवा बदलून घ्याव्यात असे रिझर्व बँकेने म्हटले आहे. बँकेचा खातेदार नसलेली व्यक्ती देखील एका दिवशी वीस हजार रुपये मूल्याच्या दोन हजारांच्या नोटा बदलून घेऊ शकतो असेही रिझर्व बँकेने म्हटले आहे.
खातेदारासाठी त्याचा बिजनेस करस्पॉन्डन्स देखील चार हजार रुपये मूल्याच्या नोटा बदलून घेऊ शकतो या नोटा पुन्हा चलनात येऊ नयेत यासाठी बँकांनी एटीएम यंत्रे आणि कॅश रिसायकल यंत्रणा याच्यातही बदल कराव्यात. बँकांनी या नोटा जमवून रिझर्व बँकेकडे पाठवून द्याव्यात या नोटा खात्यात भरणाऱ्यांसाठी अद्यावत केवायसी ची पडताळणी करावी,
तसेच कॅश ट्रांजेक्शन रिपोर्टिंग आणि सस्पीशन ट्रांजेक्शन रिपोर्टिंग याचे नियम पाळावेत नोटा बदली करण्यासाठी आलेले वरिष्ठ नागरिक, महिला, अपंग यांची गैरसोय होऊ नये याची काळजी घ्यावी. तसेच दूरच्या ठिकाणी या नोटा बदलण्यासाठी मोबाईल व्हॅनचा वापर करावा असेही रिझर्व बँकेने म्हटले आहे.