Senior Citizen Savings Scheme : ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची दमदार स्कीम, अधिक जाणून घेऊयात...

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही पोस्ट ऑफिस स्कीम 1000 रुपयांपासून सुरू करता येते.
Senior Citizen Savings Scheme
Senior Citizen Savings Schemesakal

Senior Citizen Savings Scheme : पोस्ट ऑफिसच्या अनेक स्कीम्स तुम्हाला सुरक्षितता आणि चांगला परतावा देतात. अशीच एक स्कीम ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे, ती म्हणजे सिनिअर सिटीझन्स सेव्हिंग्स स्कीम (SCSS). यात गुंतवणूकदारांना गुंतवणुकीच्या रकमेवर दरवर्षी 8% व्याज मिळते.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही पोस्ट ऑफिस स्कीम 1000 रुपयांपासून सुरू करता येते. गुंतवणुकीची कमाल रक्कम 15 लाखांपेक्षा जास्त नसावी. (read about Senior Citizen Savings Scheme scss post office saving scheme )

किती व्याज मिळेल ?

तुम्हीही रिटायरमेंट प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी SCSS हा एक चांगला पर्याय असू शकतो. कारण गुंतवणुकीच्या रकमेवर चांगला परतावा मिळतो. यासोबतच कलम 80सी अंतर्गत टॅक्स डिडक्शनचा फायदा मिळतो. याचे व्याजदर दर तिमाहीत बदलतात.

Senior Citizen Savings Scheme
Old Pension Scheme : कोल्हापुरमध्ये जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी आक्रमक

परतावा किती ?

या पोस्ट ऑफिस स्कीममध्ये गुंतवणूकदाराला 5 लाखाच्या गुंतवणुकीवर दर 3 महिन्यांनी 10 हजार उत्पन्न मिळते. 1 जानेवारी 2023 नुसार या योजनेत 8% व्याज मिळत आहे. अशा रितीने 5 लाख रुपयांची गुंतवणूक 5 वर्षांत 7 लाख रुपये होईल. म्हणजेच गुंतवणुकीच्या रकमेवरील व्याजातून मिळणारी रक्कम 2 लाख रुपये आहे.

Senior Citizen Savings Scheme
Post Office Scheme : दररोज 95 रुपये गुंतवा, मॅच्युरिटीवर मिळतील14 लाख; कसं ते घ्या जाणून

स्कीमचे फायदे ?

1) हे अकाऊंट भारतात कुठेही ट्रान्सफर केले जाऊ शकते.

2) यात गुंतवणूक केल्यावर, तुम्ही कलम 80C अंतर्गत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या टॅक्स सूटीचा दावा करू शकता.

3) योजनेत दर 3 महिन्यांनी व्याज दिले जाते. प्रत्येक एप्रिल, जुलै, ऑक्टोबर आणि जानेवारीच्या पहिल्या दिवशी तुमच्या खात्यात व्याज जमा केले जाते.

Senior Citizen Savings Scheme
Post Office Ughad Aahe: गुरुशिष्याची जोडी एकत्र! मकरंद अनासपुरे आणि दिलीप घारे उडवणार हास्याचे बार..

ही स्‍कीम कोणासाठी ?

1) 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक

2) 55 ते 60 वयोगटातील व्हीआरएस घेणारे नागरिक

3) 50 वर्षांपर्यंतचे निवृत्त संरक्षण कर्मचारी.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com