Bill Gates Met Sachin: बिल गेट्स सचिनचा मेगा प्लॅन; आता लवकरच... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sachin Tendulkar

Bill Gates Met Sachin: बिल गेट्स सचिनचा मेगा प्लॅन; आता लवकरच...

Bill Gates Met Sachin Tendulkar : मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स सध्या भारत दौऱ्यावर आहेत. मंगळवारी बिल गेट्स आरबीआय कार्यालयात पोहोचले, जिथे त्यांनी शक्तीकांत दास यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

त्यानंतर बिल गेट्स यांनी माजी क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि त्यांच्या पत्नीची भेट घेतली. ट्विटरवर फोटो शेअर करत सचिन तेंडूलकर यांनी लिहिले की, ''आपण सर्व आयुष्यभराचे विद्यार्थी आहोत.

आज लोककल्याणा बद्दलचा दृष्टीकोन शिकण्याची एक अद्भुत संधी होती. मुलांच्या आरोग्य सेवेसहवर आमचे फाउंडेशन काम करत आहे.''

सचिन यांनी बिल गेट्ससोबतचे फोटो शेअर केले :

तेंडुलकर म्हणाले की, ''जेव्हा ते आणि मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स भेटले तेव्हा त्यांनी लोककल्याणावर चर्चा केली. आम्ही सर्वजण आयुष्यभर विद्यार्थी आहोत आणि आज बिल गेट्स यांना भेटणे ही मुलांच्या आरोग्यसेवा आणि इतरांच्या कल्याणाविषयी जाणून घेण्याची एक उत्तम संधी होती.''

बिल गेट्स यांचे आभार मानत सचिन यांनी लिहिले की, ''आव्हाने सोडवण्यासाठी विचारांची देवाणघेवाण करणे हा एक चांगला मार्ग आहे.''

बिल गेट्स यांना सचिनसोबत काम करायचे आहे :

सचिन यांनी शेअर केलेल्या फोटोंवर आणि विचारांवर प्रतिक्रिया देताना बिल गेट्स यांनी लिहिले की, ''सचिन आरोग्यसेवा आणि मुलांची काळजी घेण्याबाबत चांगले काम करत आहे.

त्यांना भेटणे हा शिकण्याची एक चांगली संधी होती. बिल गेट्स यांनी सचिनसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करत एकत्र काम केल्याने विकास होऊ शकतो.'' असे सांगितले.